भाजपनंतर काँग्रेसचेही धक्कातंत्र; चरणजीतसिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे.
Charanjit Singh Channi to be new Punjab Chief Minister
Charanjit Singh Channi to be new Punjab Chief Minister

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवण्यात आले आहे. गुजरातमध्ये भाजपने धक्का दिल्याप्रमाणेच पंजाबमध्ये काँग्रेसही धक्का देण्याची दाट शक्यता होती. सुरूवातीला सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा होती. पण अचानक आमदार चरणजीतसिंग चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. (Charanjit Singh Channi to be new Punjab Chief Minister)

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. रावत यांच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. आमदारांच्या बैठकीत रंधवा यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा होती. तशी शिफारसही काँग्रेस नेतृत्वाकडे करण्यात आल्याचं वृत्त होतं. त्यामुळं रंधावा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दीही जमली होती. काही नेतेही त्यांच्या घरी दाखल झाले होते. 

पण काँग्रेस नेतृत्वानं रंधावा यांच्या नावार फुली मारत चरणजीतसिंग चन्नी यांच्या नावा पसंती दिली आहे. रावत यांनी ही घोषणा केली आहे. अमरिंदरसिंग यांच्या जागी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रतापसिंग बाजवा, अंबिका सोनी आणि राजकुमार वेर्का यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. 

जाखड, सिध्दू यांच्या नावाला होता विरोध 

सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण जाखड यांच्या नावाला आमदारांनी विरोध केल्याचं समजतं.

सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध आहे. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत होते. तसेच प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड केल्यानं त्यांचं नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com