कुंभमेळ्याच्या अनुभवावरुन सरकारला सुचला शहाणपणा; अखेर चार धाम यात्रा रद्द

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. यामुळे उत्तराखंड सरकारने अखेर चार धाम यात्रा रद्द केली आहे.
char dham yatra cancelled by uttarakhand government due to covid crisis
char dham yatra cancelled by uttarakhand government due to covid crisis

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चारही मंदिरात केवळ पुजारी पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पाडतील, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी केली. 

उत्तराखंडमध्ये याआधी झालेल्या कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाल्याने तो लवकर आटोपता घ्यावा लागला होता. या अनुभवातून शहाणे होऊन राज्य सरकारने चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चार धामांपैकी केदारनाथ मंदिर 17 मे, बद्रिनाथ मंदिर 18 मे, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे 14 मे रोजी खुली होणार होती. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

मागील वर्षीही चार धाम यात्रा रद्द करण्यात आली होती. यामुळे या वर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात या यात्रेसाठी नोंदणी केली होती. दोन वर्षांपूर्वी भाविकांच्या बुकिंगमधून गढवाल मंडल विकास  निगमला 10 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला होता. मात्र, मागील वर्षी आणि यावर्षी उत्पन्न ठप्प झाले आहे. उत्तराखंडमध्ये दरवर्षी 4 कोटी पर्यटक येतात आणि त्यातील 60 लाख धार्मिक पर्यटक असतात. 

देशात 24 तासांत 3 लाख 79 हजार रुग्ण 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 4 हजार 832 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाख 84 हजार 814 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.79 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.10 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com