विक्रम गोखलेंच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी कापले शिवसेनेच्या परतीचे दोर

शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतले असते तर काय बिघडले असते?
विक्रम गोखलेंच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी कापले शिवसेनेच्या परतीचे दोर
Uddhav Thackeray & Chandrakant PatilSarkarnama

पनवेल : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात बोलताना कंगना राणावत जे बोलली ते खरंच आहे, असे म्हंटले आणि त्यांच्यावर राज्यभरातून एकच टीका सुरु झाली. सोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले, आणि शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतले असते तर काय बिघडले असते? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. विक्रम गोखलेंचा त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

विक्रम गोखले यांच्या याच सगळ्या विधानांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या देशाच्या लोकशाहीची सुंदरता हीच आहे की कोणीही काहीही बोलू शकते असे म्हणतं प्रतिक्रिया दिली आहे. पण या सोबतच त्यांनी भाजप आता शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पनवेल मध्ये एका कार्यक्रमानंतर बोलताना ते म्हणाले, विक्रांत गोखले यांना जे वाटलं त्यांनी ते म्हंटले. पण आम्हाला आमची कुठलीही चूक वाटत नाही. आम्ही त्यावेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती घ्या असे म्हंटले होते. त्यामुळे आमची कुठलीही चूक नाही.

Uddhav Thackeray & Chandrakant Patil
विक्रम गोखले म्हणजे भूखंड विक्रीत फसवणूकीच्या गुन्हामुळे अडचणीत सापडलेला माणूस

ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांवरील प्रेम हे राजकीय आणि बेगडी प्रेम नाही. शिवसेना-भाजपा एकत्र येण्यासाठी तर बिलकुल नाही, आम्हाला एकत्र येण्याची इच्छाच नाही. ज्या प्रकारे शिवसेनेचा व्यवहार आहे ते बघून यांच्यासोबत काम करण्याची इच्छाच नाही. दंगलीच्या वेळी १५-१५ दिवस शिवसेना आम्हाला सुरक्षित ठेवायची. पण आता त्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत खूप फरक आहे. आम्हाला शिवसेनेसोबत सरकार बनवायचे नाही, आणि शिवसेनेसोबत निवडणूकाही लढवायच्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आता त्यांच्याशी युती करावी वाटत नाही.

Uddhav Thackeray & Chandrakant Patil
राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल...

चंद्रकांत पाटील यांनी कंगना राणावतच्या वक्तव्यावरही भाष्य केले. कंगना राणावतने हे म्हणायला हरकत नाही की मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागलाय. पण १९४७ साली भेटलेल्या स्वातंत्र्याबद्दल त्यांनी टिप्पणी करण्याचे कारण नाही त्यांना तो अधिकार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in