चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर

Congress आमदार Chandrakant Jadhav यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक
चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी व माजी नगरसेविका जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. पण त्याचवेळी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जयश्री जाधव यांना "भाजपकडून लढा अन्यथा पोटनिवडणुकीबाबत विचार सुरु आहे" असे म्हणत त्यांना एक प्रकारची नवी खेळी खेळली आहे.

कोल्हापूर उत्तर'चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मागील महिन्यात १ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्यानंतर ५ राज्यांच्या निवडणुकीसोबत इथेही पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना रिंगणात उतरवण्याचे अंतिम केले आहे. पण आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसचे (Congress) आवाहन आहे. जिल्ह्याच्या भाजपमध्ये देखील निवडणूक लढवायची नाही असा मतप्रवाह आहे.

चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर
महाराष्ट्र हादरला! रुग्णालयाच्या गोबरगॅस टाकीत १ भ्रूण आणि ५ कवट्या

मात्र या निवडणुकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका होत्या. युतीमध्ये कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ती भाजपला मिळाली नाही. म्हणून चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

चंद्रकांतदादांची नवी खेळी; दिवंगत आमदाराच्या पत्नीला भाजपकडून लढण्याची ऑफर
राऊतांचे प्रयत्न वाया जाणार? 'मविआ'च्या जागा वाटपात काँग्रेसचा खोडा

पाटील पुढे म्हणाले, जयश्री जाधव यांच्यासह चंद्रकांत जाधव यांचे बंधू हे देखील भाजपचे नगरसेवक होते. एकाच घरात भाजपचे दोन नगरसेवक आणि भाजपला जागा न मिळाल्याने चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढविली. पहिल्यापासून चंद्रकांत जाधव हे भाजप व आरएसएसशी निगडित होते. त्यामुळे जयश्री जाधव यांची येत्या २ दिवसांत भेट घेऊन त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा आग्रह करणार आहे. मात्र जर त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारून "काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार," असे सांगितले तर पोटनिवडणूक लढविण्याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल. त्याबाबत विचार केला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in