Narendra Modi : चंदिगड विमानतळाला आता भगत सिंगांचे नाव : पंतप्रधानांची घोषणा!

Narendra Modi : "मी फक्त दोन शब्द बोलेन, तुमचा उत्साह चारपटीने वाढेल. 'सर्जिकल स्ट्राईक." उत्साह वाढला ना? असेही मोदी म्हणाले.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली. मन की बात या कार्यक्रमात मोदींनी ही घोषणा केली. मोदी म्हणाले, की 28 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचं आणखी एक विशेष कारण आहे. या दिवशी भारतमातेचे वीर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आजपासून तीन दिवसांनी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विशेष दिवस आहे. हा दिवस म्हणजे भारतमातेचे वीर पुत्र भगतसिंग यांची जयंती आहे. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी आदरांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येणार आहे. या क्षणाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. अखेर हा निर्णय झाला आहे. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो"

Narendra Modi
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या आदर्शांवर चालत आपल्याला त्यांच्या स्वप्नांतला भारत घडवायचा आहे आणि हीच त्यांना आपली श्रद्धांजली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हुतात्म्यांची स्मारके, त्यांच्या नावावर असलेली ठिकाणे आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्याची प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वीच देशाने कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून असाच प्रयत्न केला. आता चंदीगड विमानतळाचे नाव शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

जसे आपण अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित विशेष दिन साजरा करतो, त्याच पद्धतीने प्रत्येक तरुणाने, 28 सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करून पहावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"मी फक्त दोन शब्द बोलेन पण मला माहीत आहे की, तुमचा उत्साह चौरपटीने वाढेल. हे दोन शब्द म्हणजे 'सर्जिकल स्ट्राईक." उत्साह वाढला ना? आपल्या देशात सुरु असलेल्या अमृत महोत्सवाची मोहीम उत्साहात साजरी करूया, आपला आनंद सर्वांसोबत वाटून घेऊया," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com