Chanda Kochhar : सीबीआयची 'ही' मागणी न्यायालयाकडून मान्य; कोचर यांना जन्मठेप होणार?

Chanda Kochhar : चंदा कोचर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप
Chanda Kochhar Latest News
Chanda Kochhar Latest NewsSarkarnama

Chanda Kochhar News : आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर आता फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ कलमांतर्गत अतिरिक्त आरोप ठेवण्यासाठी सीबीआयनं विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ही सीबाआयची मागणी विशेष न्यायालयाने मान्य केली आहे. यामुळे कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्यावर जन्मठेपेच्या शिक्षेची टांगती तलवार आहे.

Chanda Kochhar Latest News
Ajit Pawar News : कुणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या; त्यांना चांगले सटकावा : अजितदादांची पोलिसांना सूचना

भारतीय दंड संहितेचे कलम ४०९ हे सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, बँक अधिकारी, व्यापारी किंवा दलाल यांनी फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात करण्याशी संबंधित आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर ( Chanda Kochhar) यांच्यावर या कलमांतर्गत अतिरिक्त आरोप ठेवण्यासाठी सीबीआयनं विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

Chanda Kochhar Latest News
Crime News : संतापजनक ! नाईट ड्युटीवर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्तानं काढली महिलेची छेड

त्यावर कोचर यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सीबीआय(CBI) च्या या मागणीमुळे आरोपींच्या अधिकारांवर परिणाम होणार असल्याचं सांगितलं होतं. याचवेळी विशिष्ट हेतूनं नवा आरोप ठेवण्यात येत असल्याचा दावा करून कोचर यांचं म्हणणं ऐकण्याची मागणीही वकिलांनी केली होती.

विशेष न्यायालय काय म्हणालं?

मात्र, आता सीबीआयनं केलेल्या मागणीला विशेष न्यायालयानं(Court) मान्यता दिली आहे. यावेळी न्यायालयानं सीबीआयच्या अर्जावर कोचर यांचं म्हणणं ऐकण्याची, मांडण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं.शिवाय अतिरिक्त आरोप ठेवणं किंवा रद्द करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणं तपास अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

कोचर दाम्पत्य सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर

मुंबई उच्च न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या कारवाईवर ताशेरे ओढत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयची कारवाई कायद्याला अनुसरुन नाही असे सांगत न्यायालयाने कोचर दाम्पत्याला हा दिलासा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in