भाजपला राज्याबाहेर आव्हान : शिवसेना यूपीत 50 तर गोव्यात 9 जागा लढणार

गोवा विधानसभा निवडणूकीत (Goa Election 2022) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : 'गोव्यात (Goa) आमचे आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात नक्कीच परिवर्तन घडवू शकतो. सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे, असे म्हणत, शिवसेना (Shivsena) गोव्यात 9 जागांवर तर युपीत 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी सांगितले. (Goa Election 2022 Update)

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्व पक्ष पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांंनीही आगामी गोवा विधानसभा निवडणूकीवर (Goa election 2022) भाष्य केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनाही या निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी गोवा निवडणूकीवर त्यांनी आपले मत मांडले.

Sanjay Raut
राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यांत निवडणूक लढवणार : शरद पवारांची घोषणा

तृणमुल कॉंग्रेसही गोव्यात निवडणूकीच्या रिंगणात आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. 'गोव्यात तृणमुलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू. गोव्यात भाजप मंत्री व आमदारांनी भाजप सोडला. म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. युपीत भाजपच्या अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. याचा अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी यावेळी भाजपला लगावला.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळं भाजपने सावध राहावे. काल गोव्यासंदर्भात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक झाली. भाजपला आता लाटांचे तडाखे बसायला लागलेत. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसेच, मी उद्या दिल्लीत व परवा युपीत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोव्यातील निवडणुकांसाठी (Goa Election 2022) शिवसेनेची (Shivsena) पुर्ण तयारी झाली. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा व युपीत परिवर्तन निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in