Centre launch Rs 75 coin: संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान करणार ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण, असे असेल नाणे...

National News : भारत सरकारच्या कोलकाता मिंट'ने हे नाणे बनवले आहे
New Parliament :
New Parliament :Sarkarnama

New 75 rs Coin : देशात एकीकडे दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या मुद्द्यावर राजकारण पेटलं असताना आता केंद्र सरकारने (Central Government) पुन्हा मोठी घोषणा केली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी 75 रुपयांचे नवे नाणे जारी करणार आहेत. (Centre to launch Rs 75 coin to mark special occasio of New Parliament Building Inauguration)

New Parliament :
Pune Lok Sabha constituency : पुणे लोकसभा पोटनिवडणूक ; पक्षाने संधी दिली तर त्याचं सोनं करण्याची मुळीकांची तयारी !

अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (२५ मे), नवीन संसद भवनाच्या ((New Parliament Building Inauguration) उद्घाटनाच्या निमित्ताने 75 रुपयांचे विशेष नाणे लॉन्च केले जाणार आहे. नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाची सिंहाचे चिन्ह असेल, त्यांच्या खाली "सत्यमेव जयते" लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ हे शब्द असतील.

लायन कॅपिटलच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये रुपयाचे चिन्ह आणि 75 चे मूल्यही या नाण्यावर असेल. नाण्याची दुसरी बाजू संसद परिसराचे चित्र दाखवेल. देवनागरी लिपीतील 'संसद संकुल' हे शब्द वरच्या परिघावर आणि खालच्या परिघावर इंग्रजीत 'संसद संकुल' असे लिहिण्यात आले आहे. (National News)

New Parliament :
BJP Politics Behind Sengol: नेहरू, तामिळनाडू, मोदी आणि संसदेतील राजदंड; लोकसभेतल्या 39 जागांशी काय आहे संबंध!

मिळालेल्या माहितीनुसार, 75 रुपयांच्या या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल आणि त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि 5-5 टक्के निकेल आणि जस्त धातूचे मिश्रण असेल. इतकेच नाही तर संसदेच्या चित्राच्या खाली 2023 हे वर्ष देखील लिहिलेले असेल. हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता मिंटने बनवले आहे आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च केले जाईल. (Political news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सुमारे २५ राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे, तर २१ पक्षांनी या समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षासह (भाजप) सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) 18 घटकांसह, सात गैर-एनडीए पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

New Parliament :
Sengol in New Parliament : नवीन संसद भवनात ठेवला जाणार 'राजदंड'; नेहरूंशी जोडला आहे इतिहास; तामिळनाडूशी आहे विशेष संबंध

बहुजन समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल, जनता दल (धर्मनिरपेक्ष), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल आणि तेलगू देसम पार्टी हे सात गैर-एनडीए पक्ष या समारंभात सहभागी झाले आहेत. या सात पक्षांचे लोकसभेत 50 सदस्य आहेत आणि त्यांची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. या पक्षांच्या सहभागामुळे एनडीएला हा सरकारी कार्यक्रम असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढण्यास मदत होईल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in