महाराष्ट्रातील सत्तांतरांचं केंद्रस्थान राहिलेल्या हॉटेल 'रेडिसन'मध्येच अमित शाह मुक्कामी; 'हे' आहे कारण

Amit Shah : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सुरतनंतर थेट गुवाहाटी गाठली होती.
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Amit Shah Latest News : महाराष्ट्रातील सत्तातरांमध्ये गुवाहाटी चांगलंच चर्चेत आलं होतं. कारण शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी सुरतनंतर थेट आसाममधील गुवाहाटी गाठली होती. यावेळी या सर्व आमदारांनी गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे तळ ठोकला होता. आणि याच ठिकाणी सत्तांतरातील सर्व खलबतं देखील झाली. यावरुन सातत्याने शिंदे गटावर ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीकडून हल्लाबोल देखील करण्यात येत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा गुवाहाटी आणि रेडिसन हाॅटेल अचानक चर्चेत आलं आहे. त्यामागचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी भाजप काँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. गुजरात विधानसभेतील दिमाखदार विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपनं त्रिपुरातील विजयासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपानं राज्यव्यापी रथयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, याचदरम्यान एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

Amit Shah
Sharad Pawar : ''...म्हणून राज्यातील मुलांची लग्न होईना!''; शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग बुधवारी(दि.4) रात्री करण्यात आलं आहे. गुवाहाटीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडिंग करण्यात आलं. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शाहांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यामागं प्रतिकूल हवामान हे कारण असल्याची माहिती समोर आली आहे.

Amit Shah
Eknath Shinde : शिंदे गटाच्या अंतर्गत झगड्याची भाजपकडून दखल : आमदारांना समज देण्याची शिंदेना विनंती!

त्रिपुरातील भाजपाच्या नियोजित रथयात्रेचं उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते गुरुवारी(दि.5) सकाळी आगरतळा येथे केले जाणार आहे. मात्र, आगरतळा येथे जात असतानाच प्रतिकुल वातावरणामुळे शाह यांचं विमान गुवाहाटीतील विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर ते गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मुक्कामी होते. याचठिकाणी महाराष्ट्रातील सत्तांतरावेळी शिंदे गटातील सर्व आमदार मुक्कामी होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून दोन्ही भाजपाच्या यात्रांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच १२ जानेवारी रोजी शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह आगरतळा येथील मेळाव्यातही उपस्थित राहणार आहेत. या यात्रेद्वारे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in