काळजी नको : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत - central govt extends ITR filing date till Dec 31 | Politics Marathi News - Sarkarnama

काळजी नको : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

मंगेश वैशंपायन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्राची मुदत आधी 31 जुलै व नंतर 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे प्राप्तीकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची मुदत या कॅलेंडर वर्षाअखेरपर्यंत पुन्हा वाढविण्याची घोषणा आज दुपारी करण्यात आली. यानुसार आता प्राप्तीकर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 ही असेल.

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका व कोट्यवधी लोकांचे रोजगार हिसकावून घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) हा दिलासा दिला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे विवरणपत्र भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत आणकी मुदतवाढ दिल्याचे दुपारी ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आले. ज्या करदात्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्‍यक असते त्यांच्यासाठी आयटीआर भरण्याची नवीन मुदत त्यापुढचा महिनाभर म्हणजे 31 जानेवारी 2021 ही करण्यात आली आहे.

संबंधित लेख