केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; घरगुती सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी

केंद्र सरकराने (Central Governments) आज पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दरही कमी केले आहेत.
LPG
LPGSarkarnama

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईबाबत केंद्र सरकारने (Central Government) शनिवारी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर घरघुती एलपीजी सिलेंडरवर (Lpg Gas) 200 रुपयांची सबसिडीही जाहीर केली आहे. हे अनुदान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार आहे.

हे अनुदान वर्षाला 12 सिलेंडरवरच दिले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की ''यंदा, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलेंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देणार आहेत. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल. यामुळे सुमारे वार्षिक ६१०० कोटीच्या महसुलावर परिनाम होणार आहे.'' असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

LPG
मोदी सरकारचा महागाईवर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

दरम्यान, इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांच्या सरकारने आता महागाईवरच सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पेट्रोलवरील (Petrol) उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर (Diesel) ६ रुपये कपात करण्यात आली आहे. (Petrol Diesel price News)

पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असेही सीतारामन यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींनी नुकताच देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला.

LPG
इंधनावरील केंद्राच्या करकपातीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला हा सल्ला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले होते. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली होती. ते म्हणाले होते की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com