मोदी सरकारचा मोठा निर्णय : कोरोना विरोधातील लढ्यात उतरवणार एमबीबीएसचे विद्यार्थी

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे.
central government will deploy mbbs final year students for covid duty
central government will deploy mbbs final year students for covid duty

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारने अखेर महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विरोधातील लढ्यात आता एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि वैद्यकीय इंटर्न यांना उतरवण्यात येणार आहे. 

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी केंद्र सरकारकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. यामुळे सरकारने एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि वैद्यकीय इंटर्न यांना लढ्यात उतरवले आहे. इंटर्न या कोरोनाशी निगडित व्यवस्थापनाचे काम पाहणार आहेत. याचवेळी एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दूरध्वनीवरुन रुग्णांना सल्ला देणे आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे काम करतील. हे सर्व वरिष्ठ डॉक्टर अथवा त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. 

याचप्रकारे बीएससी अथवा जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ पदवी व प्रमाणपत्राच्या विद्यार्थांना कोरोनावरील रुग्णांवर उपचारासाठी तैनात केले जाईल. वरिष्ठ डॉक्टर अथवा नर्सेसच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील, असे सरकारने म्हटले आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 417 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 68 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 142 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 959 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 13 हजार 642 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.13 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.77 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 62 लाख 93 हजार 3 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com