कोरोनाची लस घेतल्यानंतर होताहेत मृत्यू; केंद्र सरकारची तज्ज्ञ समिती करतेय तपासणी

देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. आता लस घेतल्यामुळे होत असलेल्या मृत्यूंची बाब समोर आली आहे.
central government panel will probe deaths related to covid vaccine
central government panel will probe deaths related to covid vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लाट आली असून, सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशभरात 31 मापर्यंत कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. रक्तात गुठळ्या होऊन मृत्यू होण्याच्या या प्रकारांची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती पुढील आठवड्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे.   

कोरोनाची लस घेतल्यानंतर 31 मार्चपर्यंत 180 मृत्यूंची नोंद देशभरात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणानंतर होणाऱ्या मृत्यू अथवा इतर दुष्पपरिणामांची तपासणी तज्ज्ञ समिती करणार आहे. देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लशींचा वापर होत आहे. या दोन्ही लशींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची प्रामुख्याने तपासणी होणार आहे. लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होण्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. याबद्दल ही समिती पुढील आठवड्यांत सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. 

याआधी २३ मार्चला लसीकरणविषयी समितीने सादर केलेल्या अहवालात लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होऊन झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केला नव्हता. याविषयी बोलताना समितीचे सल्लागार एन.के. अरोरा म्हणाले की, आम्ही तपासणी करीत आहोत. हा नियमित आढावा असतो आणि तो प्रत्येक लशीचा घेतला होता. यात नवीन असे काही नाही. रक्तात गुठळ्या होण्याचे दुष्परिणामही तपासण्यात येणार आहेत. आम्ही अहवाल सरकारकडे सादर करु आणि नंतर तो जनतेसाठी जाहीर होईल. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर झालेले मृत्यू हे रक्ताच्या गुठळ्या होऊन झालेले आहेत. युरोपसह इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये आणि भारतातील मृत्यूंमध्ये मोठे साधर्म्य आहे. युरोपमध्ये लस घेतल्यानंतर होत असलेल्या मृत्यूंबद्दल युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने म्हटले होते की, आरोग्यसेवक आणि इतर नागरिकांना कोरोनाची लस घेताना यामुळे होणारे दुष्परिणाम माहिती असायला हवेत. ही लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांत रक्तात गुठळ्या होणे आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे असे प्रकार समोर आले आहेत. 

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com