हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी ; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

हार्दिक पटेलनं आपल्या स्वतःच्या भूमिका तपासायला हव्यात.
हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी ; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
Hardik Patel News, Sanjay Raut Newssarkarnama

मुंबई : पाटीदार समजाचे युवा नेते हार्दिक पटेल (hardik patel) यांनी आज (2 जून) भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला आहे. पटेल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Sanjay Raut News in Marathi)

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना याबाबत विचारले असता त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, "हार्दिक पटेलनं आपल्या स्वतःच्या भूमिका तपासायला हव्यात. देशद्रोही या शब्दाची व्याख्या ही त्यांच्याविषयी केली होती, भारतीय जनता पक्षानं. असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर त्याच्या माध्यमातून दबाव आणले जातात. हार्दिक पटेलसुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे,"

Hardik Patel News, Sanjay Raut News
Sourav Ganguly : सौरव गांगुली खेळणार नवी इनिंग ; राजकारणात प्रवेश ?

काश्मिरातील पंडितांच्या हत्या आणि गुजरातमधील हार्दिक पटेल यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. पंतप्रधान,गृहमंत्री फक्त राजकारण करत आहेत, हेच देशातील हिंदूंचं दुर्दैव आहे, असं विधान राऊतांनी केलं.

"370 कलमाचा विषय नाही. जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याचाही काही फरक पडलेला नाही. कश्मिरी पंडित रस्त्यावर उतरलेत. सामुदायिक स्थलांतर करण्याबद्दल त्यांनी सरकारला सूचना दिलीये. केंद्रातलं सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रवादी, कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल आग्रही असलेलं सरकार आहे." असे राऊत म्हणाले.

Hardik Patel News, Sanjay Raut News
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी केलं टि्वट, म्हणाले..

भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत भाजपप्रवेशाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत."आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

“राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन”, असे टि्वट हार्दिक पटेल यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in