निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी वस्तू!

केंद्रीय निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्‌विट करून याबाबतची माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे.
central armed police forces canteens to sell only swadeshi products
central armed police forces canteens to sell only swadeshi products

मुंबई : केंद्रीय निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्‌विट करून याबाबतची माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी "आत्मनिर्भर भारत अभियाना'ची घोषणा केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत गृहमंत्रालयाने स्वदेशीचा नारा दिला आहे. विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस कंपन्यांमध्ये जवळपास 10 लाख जवान कार्यरत आहेत. या जवानांचे कुटुंब मिळून एकूण 50 लाख लोक स्वदेशी वस्तू वापरणार आहेत. देशाला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने हे छोटे पाऊल असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. 

देशभरात अठराशे कॅन्टीन 
केंद्रीय निमलष्करी कंपन्यांच्या विविध मुख्यालय आणि कॅम्पमध्ये 119 मास्टर; तर 1625 सवलतीच्या कॅन्टीन आहेत. लष्करी दलामध्ये अस्तित्वात असलेल्या कॅन्टीनच्या धर्तीवर केंद्रीय निमलष्करी दलात 2006 मध्ये या कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली. या कॅन्टीनमध्ये घरगुती वापराच्या सर्व वस्तू सवलतीच्या दरामध्ये मिळतात. मास्टर कॅन्टीनमधून इतर सर्व कॅन्टीनला वस्तूंचा पुरवठा होतो. वर्षाकाठी 2800 कोटी रुपये किमतीच्या वस्तू या कॅन्टीनमधून विकल्या जातात. 

या केंद्रीय दलामध्ये निर्णय लागू होणार 
1. सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) 
2. बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) 
3. असम रायफल्स 
4. एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) 
5. सीआयएसएफ (केंद्रीय औद्यौगिक सुरक्षा दल) 
6. आईटीबीपी ( भारत-तिब्बत सीमा सुरक्षा दल) 
7. एसएसबी- सशस्त्र सीमा दल 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com