Former CM Rabri Devi: माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआय'ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

सीबीआय टीम रबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही घरातच होते.
Former CM Rabri Devi:
Former CM Rabri Devi:Sarkarnama

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणात त्यांच्या माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटूंबियांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जेव्हा सीबीआय टीम रबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचली तेव्हा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही घरातच होते. सीबीआय टीम अचानक पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले. बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर तेजस्वी यादव हे देखील काही काळाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर झाले. सकाळी 11 पासून अधिवेशन सुरू झाले.

Former CM Rabri Devi:
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

काय आहे प्रकरण?

जमिनीच्या बदल्यात एक नोकरी देण्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांना यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते. सीबीआयच्या चार्जशीटवर कोर्टाने 15 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु त्यापूर्वी सीबीआयची टीम रबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचली आहे. कोर्टात हजर राहण्याच्या मुदतीपू्र्वीच सीबीआयने कारवाई का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, केंद्रीय एजन्सीद्वारे (सीबीआय) गैरवापर करत भाजप कशा पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणत आहे, हे सर्वांनाचप्रत्येकाला माहित आहे. आम्ही इनकम टॅक्स विभाग, सीबीआय, आणि ईडीला आम्ही भाजपचे जावई म्हणतो, असा टोलाही वरिष्ठ आरजेडी नेते आणि पक्षाचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com