CBIची माहिती ; नरेंद्र गिरींनी'त्या' कथित व्हिडिओमुळेच केली आत्महत्या

नरेंद्र गिरी (mahant narendra giris) यांचा शिष्य आनंद गिरी याच्यासहीत तिघांना आरोपी ठरवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबर 2021 ला बाघम्बरी मठातील त्यांच्या कक्षात आढळला होता.
CBIची माहिती ; नरेंद्र गिरींनी'त्या' कथित व्हिडिओमुळेच केली आत्महत्या
आनंद गिरी, नरेंद्र गिरी सरकारनामा

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज ( Mahant narendra giri) मृत्यू प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi) तीन जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपपत्रात सीबीआयनं धक्कादायक माहिती दिली आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी त्या कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल होईल, म्हणून आत्महत्या केली असून हा व्हिडिओ तीन जणांनी पाहिला. पण हा व्हिडिओ सीबीआयच्या हाती लागलेला नाही. हा व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये दोन जण हे प्रयागराज येथील तर एक जण हरिव्दार येथील आहे, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र पुरी आणि महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी नरेंद्र गिरी यांचे फोनवरुन संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. या संभाषणादरम्यान आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांना धमकावले आहे. ''माझ्याजवळ असा व्हिडिओ आहे तो जर मी समाजमाध्यमांवर व्हायरल केला तर आपल्या पायाखालील जमीन सरकेल,'' अशा शब्दात आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांना धमकावलं आहे.

आनंद गिरी, नरेंद्र गिरी
जळगाव जिल्हा बँक : सतीश पाटील, देवकर, खडसे विजयी ; सहकार पॅनलची बाजी

नरेंद्र गिरी यांनी सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली असली तरी त्यांचा मे महिन्यापासून संबधितांकडून छळ सुरु होता. या धमकीनंतर नरेंद्र गिरी हे चिंतेत होते. त्यांनी वाराणसी येथील संतोष दास उर्फ सतुआ बाबा यांना याबाबत माहिती दिली होती. ''आनंद गिरी यांनी संगणकाच्या माध्यमातून हा बनावट व्हिडिओ बनविला आहे, हा व्हिडिओ आनंद गिरी यांनी तीन जणांना दाखविला आहे,'' असे नरेंद्र गिरी महाराज यांनी सतुआ बाबा यांना सांगितले होते. आपली बदनामी होईल म्हणून नरेंद्र गिरी महाराज तणावाखाली होते, असे या आरोपपत्रात म्हटलं आहे.

या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi)चैाकशी सुरु आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या गूढ मृत्यू प्रकरणी तिन्ही आरोपी 22 सप्टेंबरपासून नैनी येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत.

नरेंद्र गिरी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या तिघांवरही आहे. हरिद्वार या ठिकाणी आनंद गिरी यांच्या नव्या आश्रमात जाऊनही सीबीआयने चौकशी केली. तसंच त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. सीबीआयने याबाबतचे आरोपपत्र दाखल केले आहे. याची सुनावणी गुरुवारी (ता.२५) होणार आहे.

नरेंद्र गिरी (mahant narendra giris) यांचा शिष्य आनंद गिरी याच्यासहीत तिघांना आरोपी ठरवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबर 2021 ला बाघम्बरी मठातील त्यांच्या कक्षात आढळला होता. या प्रकरणी सीबीआयने (cbi)आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांची सखोल चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये या तिघांना आरोपी ठरवलं आहे.

बऱ्याच काळापासून नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्यावाद सुरू होते. नंतर दोघांमध्ये समेट झाला. तेव्हा हरिद्वारवरून प्रयागराजला येऊन आनंद गिरीने नरेंद्र गिरी यांच्या पायावर डोकं माफी मागितली होती. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील बाघंबरी मठातील खोलीत त्यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अनेक लोकांची नावं आहेत. या लोकांकडून त्यांना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.