महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं गूढ गुरुवारी उकलणार ; CBIकडून आरोपपत्र

नरेंद्र गिरी (mahant narendra giris) यांचा शिष्य आनंद गिरी याच्यासहीत तिघांना आरोपी ठरवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबर 2021 ला बाघम्बरी मठातील त्यांच्या कक्षात आढळला होता.

महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं गूढ गुरुवारी उकलणार ; CBIकडून आरोपपत्र
Anand Giri, mahant narendra giriSarkarnama

नवी दिल्ली : अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरणात तीन जणांना आरोपी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi)चैाकशी सुरु आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या गूढ मृत्यू प्रकरणी तिन्ही आरोपी 22 सप्टेंबरपासून नैनी येथील मध्यवर्ती कारागृहात आहेत.

नरेंद्र गिरी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या तिघांवरही आहे. हरिद्वार या ठिकाणी आनंद गिरी यांच्या नव्या आश्रमात जाऊनही सीबीआयने चौकशी केली. तसंच त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. सीबीआयने याबाबतचे आरोपपत्र दाखल केले आहे. याची सुनावणी गुरुवारी (ता.२५) होणार आहे.

नरेंद्र गिरी (mahant narendra giris) यांचा शिष्य आनंद गिरी याच्यासहीत तिघांना आरोपी ठरवलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबर 2021 ला बाघम्बरी मठातील त्यांच्या कक्षात आढळला होता. या प्रकरणी सीबीआयने (cbi)आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांची सखोल चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये या तिघांना आरोपी ठरवलं आहे.

बऱ्याच काळापासून नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्यावाद सुरू होते. नंतर दोघांमध्ये समेट झाला. तेव्हा हरिद्वारवरून प्रयागराजला येऊन आनंद गिरीने नरेंद्र गिरी यांच्या पायावर डोकं माफी मागितली होती.

Anand Giri, mahant narendra giri
हरिपाठाची एक, टोपेंच्या दोन कोविड लस घ्या ; इंदोरीकर महाराजांकडून जनजागृती

महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील बाघंबरी मठातील खोलीत त्यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अनेक लोकांची नावं आहेत. या लोकांकडून त्यांना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in