ममतांना मोठा धक्का! तृणमूलचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
ममतांना मोठा धक्का! तृणमूलचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात
Mamata BanerjeeSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ज्येष्ठ नेत्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तृणमूलच्या नेत्यांच्या मागे लागला आहे.

तृणमूलचे ज्येष्ठ नेते प्रणव चटर्जी (Pranab Chatterjee) यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. वर्धमान सन्मार्ग वेलफेअर ट्रस्ट या चिट फंडमधील गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी यातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या ट्रस्टमध्ये अनेक बनावट कागदपत्रेही आढळल्याचा तपास सीबीआय करीत आहे.

चटर्जी हे वर्धमान महापालिकेच्या प्रशासकीय मंडळावरही आहेत. त्यांनी ट्रस्टमध्ये 3 कोटी 75 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. चटर्जी यांनी आज अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी 3 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत केली आहे. चटर्जी यांच्या अटकेने राज्यातील सत्ताधारी तृणमूलला मोठा धक्का बसला आहे.

Mamata Banerjee
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय? ममतादीदी घेणार मोठा निर्णय

राज्यात नुकत्याच झालेल्या चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपला (BJP) धूळ चारली होती. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. भाजपच्या चारपैकी तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पश्चिम बंगालमधील दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या मतदारसंघात 30 ऑक्टोबरला मतदान झाले होते.

Mamata Banerjee
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळीच दुसरीकडे डीजे लावा! पोलिसांचा वादग्रस्त आदेश

मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममध्ये पराभव झाला होता. नंतर पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच चार मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. चारही मतदारसंघात विजय मिळाल्याने तृणमूलच्या आमदारांची संख्या दोनने वाढली तर भाजपची संख्या दोनने कमी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.