पाच लाखांची लाच घेताना 'ईडी'चा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात  - CBI apprehends Enforcement Directorate officer in Gujarat in case of alleged bribery | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पाच लाखांची लाच घेताना 'ईडी'चा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

मनी लाँर्डींग प्रकरणात ईडीने शुक्रवारीच काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरिया यांची संपत्ती जप्त केली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयातील (ED) अधिकारीच लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. या अधिकाऱ्याला पाच लाखांची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात एका भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. (CBI apprehends Enforcement Directorate officer in Gujarat in case of alleged bribery)

गुजरातमधील ही घटना आहे. सीबीआयने पकडलेला 'आयआरएस' अधिकारी सध्या गुजरातमध्ये उपसंचालक पदावर नियुक्त आहे. तर  ईडीचा अधिकारी सहायक संचालक म्हणून सेवेत आहे.  या दोन्ही अधिकाऱ्यांनी एका कंपनीकडे 75 लाख रुपयांची लात मागितील होती. त्यापैकी सुरूवातीला पाच लाख रुपये मागण्यात आले होते. ही रक्कम स्वीकारताना दोघांनाही पकडण्यात आले. त्यासाठी सीबीआयकडून सापळा रचण्यात आला होता.

हेही वाचा : कसाबलाही कायद्याद्वारे संधी मिळाली होती; अनिल देशमुखांचा युक्तीवाद 

ईडीकडून आजच गुजरातमध्ये संपत्ती जप्त

मनी लाँर्डींग प्रकरणात सक्तीवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधीची संपत्ती जप्त केली. गुजरात येथील स्टर्लिंग बायोटेक समूहशी संबंधित हे प्रकरण असून ईडीकडून आज ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली. 

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँर्डींग कायद्याअंतर्गत (PMLA) चार जणांची संपत्ती जप्त कऱण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची 2 कोटी 41 लाख, दिनो मोरिया यांची 1 कोटी 40 लाख, डीजे अकील नावाने प्रसिध्द असलेले अब्दुलखलील बचूअली यांची 1 कोटी 98 लाख तर खान यांची सुमारे दोन कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीची एकूण किंमत 8 कोटी 79 लाख एवढी आहे. 

स्टर्लिंग बायोटेक समूहाचे संचालक संदेसरा बंधूंनी बँकांकडून 14 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज घेत ते परत केले नाही. या प्रकरणात संदेसरा बंधु आणि इरफान सिद्दीकी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये दिनो मोरिया यांचाही समावेश आहे. ज्या संपत्तीचा या देवाणघेवाणीमध्ये समावेश आहे, त्या किंमतीचे संपत्ती जप्त कऱण्यात आल्याचे समजते. 

स्टर्लिंग बायोटेकचे मालक व संचालकांमधील निथीन संदेसरा, चेतनकुमार संदेसरा व दिप्ती संदेसरा 2017 मध्ये देश सोडून पळाले आहेत. त्यांना विशेष न्यायालयाने फरार आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेची नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या फसवणूकीपेक्षा हा मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख