बाबरी मस्जिद, गुजरात दंगलींशी संबधित खटले होणार बंद : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

2002 Gujarat Riots : तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.
 Supreme Court
Supreme CourtSarkarnama

नवी दिल्ली : बाबरी मशीद पाडाव आणि व गुजरातमधील गोध्रा दंगल या संबंधित खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाबरी मशीद पाडाव आणि गुजरात दंगल यासंबंधित सर्व खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गुजरात दंगलीशी संबंधित खटले निष्फळ ठरत आहेत, असे न्यायालयाने म्हंटले आहे.

 Supreme Court
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार ? महाराष्ट्रातील नेत्याचे नाव ही चर्चेत

तसेच आतापर्यंत यासंबधित बहुतांश प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. यासोबतच ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आलेल्या अयोध्येतील बाबरी मशीद घटनेशी संबंधित अवमान याचिकाही बंद करण्याचे, आदेश न्यायालयाने दिले आहेत. नुकतंच २००२ च्या गुजरात दंगली प्रकरणी अटक झालेल्या कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.

 Supreme Court
‘शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला; पण...’

बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. २००९ साली एका वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी काही माजी आणि विद्यमान न्यायाधीशांवरही भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते.

या प्रकरणात युक्तिवाद करताना विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की, प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे या दोघांविरुद्धचा खटला बंद करण्यात यावा. त्यांची ही मागणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्य केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in