शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्यासह 14 जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur) येथे झालेल्या हिंसक चकमकीत शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्यासह 14 जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यामध्ये खून, गुन्हेगारी कट, अपघात आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टींचा इशारा

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे काल लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यूपीतील लखीमपूर खेरी येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आले होते.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले, ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार शेतकरी आणि चार भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in