जावेद हबीब यांना महिला आयोगाचा दणका ; महिलेच्या केसांवर थुंकणे पडले महागात

महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जावेद हबीब यांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत पत्र पाठविले आहे.
jawed habib
jawed habibsarkarnama

मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : प्रसिध्द केशरचनाकार जावेद हबीब यांना एका महिलेच्या केसांवर थुंकणे महागात पडले आहे. त्यांच्यावर मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जावेद हबीब यांना आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही करण्यात आली होती. महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत पत्र पाठविले आहे.

जावेद हबीब (jawed habib) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याने या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. ''हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी,'' असे संबधित महिलेने म्हटले आहे. या महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे व्हिडिओमध्ये सांगत असल्याचे दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. साथीच्या कायद्याशी संबंधित कलमांतर्गत जावेद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jawed habib
सोमय्यांना माझी माफी मागावीच लागेल!

मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. बागपतमधील बरौतची ही महिला रहिवासी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हबीब यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

हबीब एका शोमध्ये केस कापत असताना ते या महिलेच्या डोक्यावर थुंकले. हा प्रकार पाहून नागरिक संतापले आहेत. “एक वेळ गल्लीतल्या नाक्यावर केस कापू पण जावेदच्या दुकानात जाणार नाही.” अशी जोरदार टीका केली जात आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येदरम्यान, या कृत्याबद्दल लोक जावेद हबीब यांच्यावर टीका करत आहेत.

गुरुवारी रात्री उशिरा हबीब यांनी इंस्टाग्रामवर माफी मागितली. ''माझ्या सेमिनारमधील काही शब्दांमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. आमचे सेमिनार व्यावसायिक आहेत. हे शो खूप वेळ चालतात. मी फक्त एकच सांगतो, माझ्या मनापासून. कोणाला वाईट वाटले असले असल्यास क्षमस्व. माफ करा, मनापासून माफी मागतो,'' असे हबीब म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले.

jawed habib
निवडणुकीत होऊ द्या खर्च ; ५ राज्यांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसणार

प्रात्यक्षिकात हबीब म्हणाले, “जर पाण्याची कमतरता असेल तर थुंकीचा वापर करा.” त्याचे हे कृत्य पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात. काही जण तर त्यांना दाद देखील देतात. परंतु ज्या महिलेच्या (पुजा गुप्ता) डोक्यावर ते थुंकले तिला मात्र हे खूप अपमानास्पद वाटलं.

''ही घटना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या कोविडवरील मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करणारी आहे आणि अशा परिस्थितीत लोकांमध्ये थुंकणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे,'' असे पत्र आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना पाठविले आहे. “आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही याचा तीव्र निषेध तर करतोच पण या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासता यावी यासाठी तुमचा तात्काळ हस्तक्षेप हवा आहे.” असे पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in