Crime news : क्रिडा मंत्र्यावर गुन्हा दाखल: महिला प्रशिक्षकाचा लैंगिक छळाचा आरोप

महिलेच्या आरोपांनंतर मात्र मंत्र्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Crime news :
Crime news :

Hariyana News : महिलेचा लैंगिक छळ आणि अपमानास्पद वर्तन केल्याप्रकरणी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यावर एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्युनियर अॅथलेटिक्स महिला प्रशिक्षकाने त्यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी चंदिगड पोलिसांनी संदीप सिंग यांच्याविरोधात विनयभंग आणि धमकी देण्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, महिलेच्या आरोपांनंतर मात्र मंत्री सिंग यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. ''आपली प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप लावले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अहवाल समोर येईपर्यंत मी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे.' असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

Crime news :
J P Nadda : भाजपच्या 'मिशन १४४' ची सुरुवात महाराष्ट्रातून होणार; जे.पी.नड्डा 'या' मतदारसंघात घेणार सभा

काय आहेत महिला प्रशिक्षकाचे आरोप?

या महिलेने २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या महिलेची सप्टेंबर 2022 मध्ये क्रीडा विभागात कनिष्ठ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी संदीप सिंग यांनी तिला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर मेसेज पाठवले आणि कागदपत्राच्या बहाण्याने आपल्याला घरी बोलावले. जेव्हा आपण त्यांना भेटायला गेलो तेव्हा मंत्री सिंग यांनी आपल्याशी गैरवर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सिंग यांच्या तावडीतून सुटताना आपला टी-शर्टही फाटला. कशीतरी आपण त्यांच्या तावडीतून सुटून बाहेर पडलो, असे धक्कादायक आरोप महिलेने केले आहे.

एवढेच नाही तर, मी त्यांचे ऐकले नाही, म्हणून त्यांनी माझी बदली केली. माझे प्रशिक्षणही बंद झाले. या घटनेची तक्रार डीजीपी कार्यालय, सीएम हाऊस आणि गृहराज्यमंत्री अनिल विज यांच्याकडे करण्याचा मी सर्व स्तरावर प्रयत्न केला, मात्र कुठेही सुनावणी झाली नाही.आपला मानसिक छळ होत असल्याचे महिलेने सांगितले. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना क्रीडामंत्र्यांनी महिला प्रशिक्षकाचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हे महिलेचे षडयंत्र असून, ती माझ्यावर खोट्या आरोपात अडकवत आहे, असल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in