पालघरच्या इतिहासाची शिवसेना गोव्यात पुनरावृत्ती करणार?

Goa Assembly election 2022 : पालघरमध्ये शिवसेनेने चिंतामणराव वणगा यांच्या मागे ताकद उभी केली होती.
Shriniwas Vanaga - Sanjay Raut - Utapl Parrikar
Shriniwas Vanaga - Sanjay Raut - Utapl Parrikar Sarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly election 2022) सध्या भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utapl Parrikar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. उत्पल पर्रीकर आणि भाजपचे (BJP) गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये पणजीच्या जागेवरुन कलगीतुरा पहायला मिळाला. या दरम्यान, पर्रीकर यांना पणजीची जागा न दिल्याने त्यांनी आता तिथून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये पणजीत सगळ्यांचे लक्ष शिवसेनेच्या (Shivsena) भूमिकेकडे लागून राहिलेले आहे.

कारण शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप वगळून सर्व पक्षांना एक विनंती करत म्हटले आहे की, गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर जर स्वतंत्र लढत असतील तर त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार देऊ नये. तसेच त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. संजय राऊत यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोर प्रस्ताव ठेवला आहे. हीच खरी पर्रीकरांना श्रद्धांजली असेल, असंही संजय राऊत म्हणाले होते.

Shriniwas Vanaga - Sanjay Raut - Utapl Parrikar
मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले, म्हणाले, 'मी यावर समाधान मानणार नाही'

शिवसेनेने पणजीमधून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राऊत यापुर्वी म्हटले होते की, मी माझा उमेदवार सध्या जाहीर करत आहे. पण, पर्रीकरांचा जर अपक्ष लढण्याचा निर्णय झाला तर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. जर अर्ज दाखल केल्यानंतर पर्रीकरांचा निर्णय झाला तर अर्ज मागे घेऊ, असेही त्यांनी आश्वासन दिले होते. तसेच स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलून आपण हा निर्णय घेतल्याचे ही त्यांनी सांगितले होते.

त्यानुसार आता उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेना आता आपला इथला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे. एकूणच इथे शिवसेना मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला पुर्ण ताकदीने पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळेच इथे आता शिवसेना राज्यातील पालघरच्या इतिहासाची पुनरावृत्ती पणजीत करणार का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Shriniwas Vanaga - Sanjay Raut - Utapl Parrikar
मुख्यमंत्री लवकरच अॅक्शन मोडमध्ये ; आदित्य ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

कारण पालघरमधील भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणराव वणगा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वणगा यांच्याकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे आरोप स्वतः त्यांनी केले होते. त्यावेळी शिवसेनेने श्रीनिवास वणगा यांचा पक्षप्रवेश करत लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभे केले. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वणगा यांना विधानसभेच्या निवडणुकीला उभे केले आणि आज श्रीनिवास वणगा आमदार आहेत. त्यानंतर आता गोव्यातही शिवसेनेने वणगा यांच्याप्रमाणे पर्रीकर यांच्यामागे ताकद उभी केल्यास भाजपची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com