'महादेवाच्या कृपेने नरेंद्र मोदी वाचले, नाहीतर, यांची हत्याही होऊ शकली असती'

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सगळ्या जगाला माहित आहे, जी घटना घडली तो केवळ योगायोग नव्हता.
'महादेवाच्या कृपेने नरेंद्र मोदी वाचले, नाहीतर, यांची हत्याही होऊ शकली असती'
PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंजाबच्या (Panjab) फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या निष्काळजीपणाबद्दल केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटीवरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही होऊ शकली असती, पंतप्रधानांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा काही योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्याही वर त्याचे धागेदोरे सापडू शकतात. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती,असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi
निवडणुकीआधी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपनं टाकला डाव!

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सगळ्या जगाला माहित आहे, जी घटना घडली तो केवळ योगायोग नव्हता. ही घटना देशाच्या पंतप्रधानांसोबत नाही, तर संपूर्ण देशासोबत घडली आहे. ज्यांनी हे षडयंत्र रचलं ते काय तपास करणार?." असा सवालही उपस्थित करत त्यांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) सविस्तर अहवाल मागितला होता. त्यावर पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवालयाकडे लिखित रिपोर्ट सादर केला असून याप्रकरणी स्थापन केलेली समिती पुढील तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय केंद्रीय गृह मंत्रायलानेही पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे.

या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा (CJI NV Ramana) यांनीही पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील प्रवासाची प्रवासाची नोंद आणि तपास यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातबरोबर, न्यायालयाने पंजाब पोलीस अधिकाऱ्यांसह एसपीजी आणि इतर तपास यंत्रणांनाही सहकार्य करण्यास आणि संपूर्ण रेकॉर्ड सील करण्यासाठी आवश्यक ते सर्व बाबी पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.

न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत (१० जानेवारी) तहकूब करण्यात आली. तसेच, प्रवासाची नोंद आणि तपास यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने केंद्र आणि राज्याला या प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सोमवारपर्यंत थांबवण्यास सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in