By Election Results : काँग्रेसला 'अच्छे दिन' : चार राज्यातल्या पोटनिवडणुकीत भाजपला अवघी एकच जागा!

By Election Results : काँग्रेसने तीन जागा जिंकल्या, तर भाजपने चिंचवडची एकच जागा!
By Election Results :
By Election Results :Sarkarnama

By Election Results : त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. महाराष्ट्रात दोन तर उर्वरीत राज्यांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली.

चार राज्यांमध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. यापैकी काँग्रेसने तीन, भाजपने एक, तर एक जागा ऑल झारखंड स्टु़डंट युनियन या पक्षाने एक जागा जिंकली आहे. यामुळे त्रिपुरा, मेघालय, नागालँडतीन राज्यात काँग्रेससाठी चांगलं चित्र दिसत नसले तरी, विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पोटनिवडणुकच्या एकूण पाच जागांपैकी भाजपला केवळ चिंचवडच्या जागा जिंकता आली.

By Election Results :
Pune By Election : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी,संजय काकडेंनी थेट फडणवीसांना पाठवला मेसेज; म्हणाले...

झारखंड :

झारखंड राज्यात रामगढ या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली. या ठिकाणी ऑल झारखंड स्टु़डंट युनियन या पक्षाच्या उमेदवार यांनी विजय मिळवलेला आहे. निवडणुक आयोगाच्या वेबसाईट नुसार ऑल झारखंड स्टु़डंट युनियन या पक्षाच्या उमेदवार सुनिता चौधरी यांनी १ लाख १५ हजार ५९५ मते मिळवत विजय साकारला. तर काँग्रेसचे उमेदवार बजरंग माहतो यांना पराभव पत्करावा लागला. माहतो यांना ९३ हजार ६५३ मते मिळाली.

पश्चिम बंगाल :

पश्चिम बंगालमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. बंगालमधील 'सागरदिघी' या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे बायरन बिस्वास यांनी विजय मिळवला. बिस्वास यांना 87 हजार 611 मते मिळाली. तर ममता बँनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे उमेदवार देबाशिश बँनर्जी यांना पराभव स्विकारावा लागला. बँनर्जी यांना 64 हजार 631 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार दिलीप सहा यांना २५ हजार 793 मते मिळली, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तामिळनाडू :

तामिळनाडूमध्ये 'ईरोडे पूर्व' या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. इथे काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसचे ई व्ही के एस इलँगोवन यांनी तब्बल 76181 मते मिळवत विजय साकार केला आहे. त्यांनी एआयएडिएमकेकडून उभे असलेले के एस थेनारस्सू यांचा पराभव केला आहे. थेनारस्सू यांना 28250 मतांवार समाधान मानावे लागले.

By Election Results :
Kasba By-Election : फडणवीस-पटोलेंमध्ये रंगली टोलेबाजी : 'धंगेकरांना जागा करावी लागेल' ; फडणवीस म्हणाले, 'एक जागा...'

महाराष्ट्र :

महाराष्ट्रात दोन विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. कसबा आणि चिंचवड या दोन जागांसाठी निवडणुका पार पडल्या. कसबामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तर भाजपचे हेमंत रासने यांना धक्कादायक पराभव पत्कारावा लागला. धंगेकर यांना 73194 मते मिळाली. तर रासनेंना 62244 मते मिळाली. तर चिंचवड मध्ये भाजपच्या उमेदवार यांना अश्विनी जगताप यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभव स्वीकारावा लागला. जगताप यांना 105038 मते मिळाली, तर काटे यांना 81831 मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in