Parliament Budget Session 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६६ दिवसात होणार २७ बैठका..

Parliament Budget Session 2023 : १४ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान अधिवेशन होणार नाही.
Parliament Budget Session 2023
Parliament Budget Session 2023sarkarnama

Parliament Budget Session 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. (Parliament Budget Session 2023 news update)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६६ दिवस चालणार असून यात २७ बैठका होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ता. ६ एप्रिल रोजी अधिवेशनांची सांगता होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार होते.

विविध विषयांवर चर्चा

१४ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान अधिवेशन होणार नाही, असे जोशी यांनी टि्वटमध्ये स्पष्ट केलं आहे. दोन टप्प्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे.राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका

संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाबाबत कामकाज करुन त्यांचा अहवाल संबधित मंत्र्यालय, विभागाना देण्यासाठी १४ फेब्रुवारी ते १२ मार्च अधिवेशन होणार नाही, असे जोशी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे, कारण पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Parliament Budget Session 2023
Pune Crime News : अजितदादांनी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाची दखल ; १३ जणांवर कारवाई

दुसऱ्या कार्यकाळात अंतिम फेरबदल

केंद्र सरकारच्या मंत्रालयांत सध्या अस्वस्थता आहे. पक्षाचे मुख्यालय ते पीएमओपर्यंत सुरू असलेल्या बैठका मोदी कॅबिनेटमध्ये मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत. सूत्रांनुसार, हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अंतिम फेरबदल असेल. भाजच्या नेमलेल्या मोदी ड्रीम टीम यंदा १० राज्यांत विधानसभा निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळेल.

Parliament Budget Session 2023
Karnataka Political News : सुषमा यांच्या 'त्या' विधानाची चर्चा ; जनार्दन रेड्डींच्या एन्ट्रीमुळे नव्या समीकरणांची नांदी

सरकार वाचवण्याचे आव्हान

यंदा कर्नाटक, तेलंगण, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा मध्ये निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीरातही निवडणुक होण्याची शक्यता आहे. यापैकी ६ राज्यांतील सरकार वाचवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात तेथील नेत्यांना संधी देण्यावर भर राहील. अकार्यक्षम मंत्र्यांना मोदींच्या ड्रीम टीममध्ये स्थान मिळणार नसल्याचे संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com