Budget 2023 : काय स्वस्त, काय महाग ? ; कररचनेतील नवा बदल जाणून घ्या !

Union Budget Live Updates : एलईडी दिवे, सिगारेट, विदेशी किचन चिमणी, सोन, प्लॅटियम, चांदीचे दागिने महागणार आहेत.
Budget 2023 nirmala sitharaman live updates
Budget 2023 nirmala sitharaman live updatessarkarnama

Budget Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारमण (Nirmala Sitharaman)यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023-24) सादर केला. त्यांनी पाचव्यांदा अर्थसंकल्प होता. यात विविध क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नवीन योजना जाहीर करण्यात आल्या.

सर्वात महत्वाचे सामान्य नागरिकांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झाले हे जाणून घेऊया. अर्थसंकल्पात त्यांनी काही वस्तू स्वस्त तर काही भलत्याच महाग झाल्याचे स्पष्ट केले. अर्थमंत्री

निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात विविध कराबाबत झालेल्या बदलांची माहिती दिली. तर मोबाईल, इलेक्ट्रीक कार, खेळणी स्वस्त होणार असल्याची त्यांनी सांगितले. खेळणी वर लागणारा सीमाशुक्ल कर कमी करुन १३ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे खेळणी स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Budget 2023 nirmala sitharaman live updates
Budget 2023 Live : इन्कम टॅक्सची स्लॅब ७ लाखांवर

या बरोबरच सायकल, लिथियम आयन बॅटरीवरील सेवाकरावर सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहनावरील बॅटरीवरील सेवाकर कमी करण्यात आला आहे. या बॅटरीपण स्वस्त करण्यात आल्या आहे. तसेच मोबाईल बॅटरी देखील स्वस्त होणार आहे. एलईडी टिव्ही, बायोगॅससंबधीत सर्व वस्तू स्वस्त होणार आहे. एलईडी दिवे, सिगारेट, विदेशी किचन चिमणी, सोन, प्लॅटियम, चांदीचे दागिने महागणार आहेत.

स्वस्त वस्तुंमध्ये प्रामुख्याने एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रीक वाहने, बायोगॅसशीसंबंधीत वस्तू, लिथियम सेल्स, सायकल यांचा समावेश आहे.

तर महाग वस्तूंमध्ये सिगारेट, मद्य, छत्री, विदेशी किचन चिमनी, सोने, आयात केलेले चांदिचे सामान, प्लेटिनम, एक्स-रे मशीन, हिरे आदी वस्तूंचा समावेश आहे.

या दरवाढीचा चटका सिगारेटप्रेमींना काहीसा अधिकच लागला. त्यामुळे सिगारेट प्रेमींकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. सिगारेट महागणार असल्यामुळे नेटकऱ्याची सोशल मीडियावर शाब्दीक युद्ध रंगले आहे. आयकराची मर्यादा ५ लाखांवरुन ९ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

या वस्तू महागणार

सिगारेट, विदेशी किचन चिमणी, सोने, प्लॅटियम,चांदीचे दागिने

या वस्तू स्वस्त होणार

कॅमेरा, लेन्स, मोबाईल, इलेक्ट्रीक कार, सायकल, खेळणी

Budget 2023 nirmala sitharaman live updates
Budget 2023 Live Updates : शेतीसंबंधित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

कररचनेत केलेला बदल जाणून घ्या

(Income Tax slabs under New tax regime)

0-3 लाखांवर कर नाही

3-6 लाख- ५ टक्के

6-9 लाख०- १० टक्के

9-12 लाख- १५ टक्के

12-15 लाख- २० टक्के

15 लाखांच्या वर ३० टक्के

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com