Union Budget 2023: निर्मला सीतारामन यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधींची आठवण..

Nirmala Sitharaman : लाल रंगाची ही साडी यांना प्रल्हाद जोशी यांनी भेट म्हणून दिली होती.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman sarkarnama

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (बुधवारी) अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विविध करामध्ये दिलेल्या सवलतीमुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची साडी चर्चेत आली. ही साडी यांच्यासाठी खास डिझाईन करण्यात आली होती.

निर्मल सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेली साडी कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात तयार करण्यात आली होती. हाताने तयार केलेली ही साडी इल्कल (Ilkal) सिल्क पासून तयार करण्यात आली होती. लाल रंगाची ही साडी यांना प्रल्हाद जोशी यांनी भेट म्हणून दिली होती. त्यात नवलगुंडा कसूठी (the embroidery of Navalagunda)आहे.

Nirmala Sitharaman
Union Budget 2023 : नवे स्टार्टअप, डिजिटल प्रशिक्षण अन् कृषी कर्जासाठी २० लाख कोटी

डिसेंबरमध्ये त्यांनी ही साडी घेतली धारवाडच्या आरती क्राफ्ट येथून विकत घेतली होती. त्यांना ७ इल्कल सिल्क साड्या आरती क्राफ्टमधून पाठविण्यात आल्या होत्या. यातील दोन साड्यांची त्यांनी निवड केली.

लाल रंग का निवडला..

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अंतिम पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, निर्मला सीतारामन यांनी समृद्धी, आशा आणि परिवर्तनाची छाया निवडली. ज्यामुळे त्यांनी चमकदार लाल रंगाची साडी नेसली.हिंदू परंपरेत, लाल रंग सामान्यत: देवी दुर्गाशी संबंधित आहे, स्त्री शक्ती आणि शक्तीचे मूर्त स्वरूप. त्यामुळे त्यांनी साडीचा हा रंग निवडला असल्याचे सांगण्यात आले.

इंदिरा गांधींची आठवण

1980 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ही साडी परिधान केल्यानंतर या साडीचं महत्त्व वाढलं. इंदिरा गांधींमुळे (Indira Gandhi Sambalpuri Silk Saree) संपूर्ण भारतात या साडीची चर्चा झाली आणि संबळपुरी प्रसिद्ध झालं. त्यानंतर आता मोठा व्यवसाय या गावातून चालतो.

अनेकदा नोटांशी जुळणारी साडी नेसतात. त्यांनी क्रीम कलरची मंगलागिरी साडीही नेसलेली दिसली होती. 20 रुपयांच्या नोटेशी जुळणार्‍या हिरव्या मंगलगिरी साड्यांचा देखील त्यांनी2019 मध्ये नेसली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com