पक्षातील खासदाराचं घर पेटवणारा माजी आमदार भाजपत 

भाजपपकडून मंगळवारी पक्षात येणाऱ्या नेत्यांची यादीच जाहीर केली.
BSP Leader Jitendra singh Babloo quits Bsp and joins BJP
BSP Leader Jitendra singh Babloo quits Bsp and joins BJP

नवी दिल्ली :  पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण सुरू झालं आहे. अन्य पक्षांतील नेते, आमदारांना घेण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी फासे टाकले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर असले तरी एका माजी आमदाराच्या प्रवेशाने वाद निर्माण झाला आहे. आपल्या पक्षाच्या खासदारांचे घर जाळल्याचा आरोप असलेल्या माजी आमदाराला भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. (BSP Leader Jitendra singh Babloo quits Bsp and joins BJP)

बहुजन समाज पक्षाचे नेते जितेंद्र सिंह बबलू यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांचं घर जाळण्याचा आरोप आहे. ही घटना जोशी या काँग्रेसमध्ये असतानाची आहे. बबलू यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी त्यांना वाकून नमस्कार करत पक्षात प्रवेश दिल्याचे छायाचित्रही व्हायरल झालं आहे. 

भाजपपकडून मंगळवारी पक्षात येणाऱ्या नेत्यांची यादीच जाहीर केली. त्यामध्ये आजमगढचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पंकज मोहन सोनकर यांच्यासह श्याम शंकर तिवारी, गाजियाबाद येथील मनोज शर्मा, रायबरेलीतील प्रवेश सिंह हेही मायावती यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहे. आग्रा येथील डॉ. बीना लवानिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण बबलू यांच्या प्रवेशानं वाद निर्माण झाला आहे. 

दरम्यान, जितेंद्र सिंह बबलू हे मुळचे अयोध्याचे आहेत. ते बसपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर जोशी यांचं घर जाळल्याचा आरोप आहे. ही घटना 2009 मध्ये घडली होती, त्यावेळी जोशी काँग्रेसमध्ये होत्या. या प्रकरणात हुसेनगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 2011 मध्ये तपासात बबलू यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना अटकही झाली होती. 

बबलू यांची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नाअंतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हाही जितेंद्र सिंह यांना पोलिस अटक करणार होते. पण उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं. बबलू हे बाहूबली नेते असल्याने भाजपने त्यांना पक्षात स्थान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अशा नेत्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचे सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com