राजकीय पेच! काँग्रेसमधील 'त्या' सहा आमदारांना भाजप पुरस्कृत उमेदवाराला मत देण्याचा व्हीप

भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार मैदानात
Congress and BJP
Congress and BJP Sarkarnama

जयपूर : भाजपने (BJP) राजस्थानमध्ये ऐनवेळी चौथ्या जागेसाठी उमेदवाराला मैदानात उतरवून डाव टाकला आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले आहेत. चंद्रा हे मैदानात उतरल्यामुळं काँग्रेसची (Congress) कोंडी झाली आहे. बहुजन समाज पक्षातून (BSP) काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांना गोयल यांना मतदान करण्याचा व्हीप बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राजस्थानमध्ये बसपच्या सहा आमदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलिन केला होता. त्यांच्या मतांवरून आता राजकारण तापलं आहे. बसपचे प्रदेशाध्यक्ष भगवानसिंह बाबा यांनी या आमदारांना पक्षादेश बजावला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या चंद्रा यांना मत द्यावे, असा हा आदेश आहे. हे सहा आमदार बसपच्या चिन्हावर 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पक्षादेश बंधनकारक असल्याचा दावा पक्षाने केला आहे. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष भगवानसिंह बाबा म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणाशी बसप सहमत नाही. त्यामुळं आम्ही अपक्ष उमेदवाराला मत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा पक्षादेश आमदारांना बजावण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आमदारांवर कारवाई करण्यात येईल.

राजेंद्र गुढा, लखन मीना, दीपचंद खेरीया, संदीप यादव, जोगिंदर अवाना आणि वाजिब अली अशी आमदारांची नावे आहेत. त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये बसपचा विधिमंडळ गट काँग्रेसमध्ये विलिन केला होता. आता त्यांच्या मतांवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. बसपने या विलिनीकरणाला आधीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. ही याचिका प्रलंबित आहे. असे असले तरी तज्ञांच्या मते, बसपचा संपूर्ण विधिमंडळ गट काँग्रेसमध्ये विलिन झाल्याने त्या आमदारांचा आता बसपशी काहीही संबंध नाही.

Congress and BJP
मिशन फत्ते! अखेर 'त्या' सहा आमदारांना घेऊन चार्टर विमानानं मुख्यमंत्री थेट हॉटेलवर उतरले

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामत जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्यावर बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत.

Congress and BJP
घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसनं टाकला डाव अन् भाजपचीही केली कोंडी

यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com