बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार; 88 हजार जणांची हकालपट्टी करणार..

बीएसएनएलच्या खासगीकरणाचे पाऊल केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने उचलले आहे. आता याच पक्षाच्या खासदाराने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना गद्दार ठरवले आहे. तब्बल 88 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
bsnl employees are traitors says bjp mp anantkumar hegde
bsnl employees are traitors says bjp mp anantkumar hegde

बंगळूर : भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे हे कायम वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आघाडीवर असतात. आता बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. बीएसएनएलच्या खासगीकरणाचा घाट सरकारकडून घातला जात असून, याच्या समर्थनासाठी हेगडे यांनी थेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच गद्दार ठरवले आहे. 

उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे झालेल्या एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार हेगडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा उद्धार केला. ते म्हणाले की, संकटात सापडलेल्या कंपनीसाठी काम करण्याची इच्छा नसलेले बीएसएनएलचे कर्मचारी हे गद्दार आहेत. बीएसएनएलच्या संपूर्ण व्यवस्थेतच गद्दार भरलेले आहेत. त्यांचे वर्णन करण्यासाठी गद्दार हाच शब्द अतिशय योग्य आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही सरकारी कंपन्यांसमोरील अडचणी सोडवू शकले नाही, अशी कबुलीही हेगडे यांनी दिली. ते म्हणाले की, सरकारने कंपनीला पैसा, मनुष्यबळ आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा दिल्या. तरीही बीएसएनएलचे कर्मचारी कामच करीत नाहीत. पंतप्रधान मोदी हे डिजिटल इंडियाबद्दल बोलतानाचा त्यासाठी निधी आणि तंत्रज्ञानही दिला आहे. तरीही हे कर्मचारी कामच करण्यालस तयार नाहीत. 

संपूर्ण देशासाठी बीएसएनएल ही काळा डाग ठरला असून, लवकरच आम्ही ही कंपनी संपवू. केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचे धोरण आणले आहे. बीएसएनएल बंद करुन खासगी कंपन्यांना या क्षेत्रात प्रवेश दिला जाईल, असे हेगडे म्हणाले. हेगडे यांनी आधी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्ये करुन वाद ओढवून घेतले होते. आता या प्रकरणी हेगडे यांनी व्यक्तिगत मत मांडले की पक्षाची भूमिका, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. राज्यातील या घडामोडींवरुन बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com