संसदेत पॉर्न क्लिप पाहणं खासदाराला पडलं महागात ; पक्षातून हकालपट्टी

संसदेतील परंपरा आणि संकेत यांचे पालन न केल्याच्या तक्रारीनंतर त्याला पक्षातून डच्चू देण्यात आला आहे.
संसदेत पॉर्न क्लिप पाहणं खासदाराला पडलं महागात ; पक्षातून हकालपट्टी
sarkarnama

नवी दिल्ली : संसदेत पॉर्न क्लिप (XXX Clip) पाहणं एका खासदाराला चांगलचं महागात पडलं. आपल्या या असभ्य कृत्याबद्दल त्याला राजीनामा द्यावा लागला आहे. त्याला पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे. संसदेतील परंपरा आणि संकेत यांचे पालन न केल्याच्या तक्रारीनंतर त्याला पक्षातून डच्चू देण्यात आला. झालेल्या या प्रकाराबाबत खासदाराला रडू कोसळलं, त्याने माफी मागितली आहे.

ब्रिटनमधील एका खासदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. नील पैरिश (Neil Parish) असं त्याचं नाव आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (British Parliament) खासदार नील पारिस यांच्यावर हाऊस ऑफ कॉमन्सच्या (ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह) कामकाजादरम्यान मोबाइल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचा आरोप आहे.

संसदेत अश्लील कंटेंट पाहिला जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीला एका महिला मंत्र्याने दुजोरा दिला होता. कॉमन्स चेंबरमध्ये त्यांच्या शेजारी बसलेला एक सहकारी पुरुष खासदार पॉर्न फिल्म पाहत असल्याचे महिला मंत्र्यांनी सांगितले होते.

संसदेत पॉर्न क्लिप पाहणं खासदाराला पडलं महागात ; पक्षातून हकालपट्टी
राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल

"माझ्या कृतीमुळे माझे कुटुंबीय आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यावरुन सध्या जो हंगामा लागला आहे. तो पुढे चालू नये,"असे त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये 'वेडेपणाच्या क्षणी'आपण पोर्नोग्राफी पाहिल्याचे त्यांनी मान्य केले.

संसदेत पॉर्न क्लिप पाहणं खासदाराला पडलं महागात ; पक्षातून हकालपट्टी
शिवसेनेला थोपविण्यासाठी आप निवडणुकीच्या रिंगणात ; प्रीती शर्मा मेनन यांच्यावर जबाबदारी

"माझी सर्वात मोठी चूक होती की, मी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा पाहिला. तो पाहताना माझे ठिकाणही चुकले. माझ्याकडून ही चूक जाणूनबुजून घडली असेही त्यांनी मान्य केले. माझ्याकडून तो एक वेडेपणाचा क्षण ठरला. मी जे केले त्यावेळी मला जराही जाणीव नव्हती की आजूबाजूचे लोक मला पाहत आहेत," असे पैरिश म्हणाले.

२०१० मध्ये खासदार झालेल्या पैरिश यांच्याबाबत या प्रकारामुळे अनेक तक्रारी आल्या आहेत. ५ मे रोजी स्थानिक निवडणुका आहेत, त्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पैरिश हे एक शेतकरी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.