WFI Controversy: कुस्तीच्या मैदानात मुष्ठीयोद्धा: मेरी कॉमची समिती करणार बृजभुषण सिंहांची चौकशी

Mary Com: गेल्या आठड्यात अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते.
Mary Com
Mary ComSarkarnama

Wrestlers vs WFI: मुष्ठीयोद्धा खेळाडू मेरी कॉम यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपाची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तोपर्यंत त्यांना कुस्ती महासंघापासून लांब राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही चौकशी होईपर्यंत कुस्ती महासंघाची जबाबदारी मेरी कॉम यांच्याकडे राहणार आहेत. पुढील चार आठवड्यात बृजभुष यांची चौकशी करुन त्याचा अहवाल सरकारला सोपवण्यात येणार आहे.

गेल्या आठड्यात अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह(Brijbhushan Singh) यांच्याविरोधात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत त्यांना पदावरुन हटवण्याची आणि भारतीय कुस्ती महासंघही बरखास्त करण्याची मागणी केली होती. यासाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर मैदानावर तीन दिवस आंदोलनही केलं.

Mary Com
BJP News: गोंधळलेला भाजप सत्यजीत तांबेंना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत?

या आंदोलनानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अनुराग ठाकून यांनी या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी भारतीय ऑलम्पिक संघाची 7 सदस्यीय समितीची घोषणा केली. ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करणार आहे. खेळाडू मेरी कॉम यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही चौकशी करणार असून पुढील चार आठवड्यात त्याचा अहवाल क्रिडा मंत्रालयाकडे सादर करणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती महासंघाचं काम देखील मेरी कॉमच पाहणार आहे.

ही समिती बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची ४ आठवड्यांच्या आत चौकशी करणार आहे. या समितीत मैरी कॉम यांच्यासोबत डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि इतर दोन कायदा तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. जोपर्यंत ही चौकशी आपला अहवाल सरकारला सोपवत नाही तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून दूर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच चौकशीमध्येही सहकार्य करतील. तोपर्यंत ही समितीच कुस्ती महासंघांचे कामकाज पाहिल.

Mary Com
BrijBhushan Singh News : लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांबाबत क्रीडामंत्री आज घेणार मोठा निर्णय

दरम्यान, खेळाडूंच्या आरोपांवर शंका उपस्थित करणारे कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांना क्रीडा मंत्रालयाने निलंबीत केलं आहे. दरम्यान या आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने 72 तासात कुस्ती महासंघाला या संदर्भात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. कुस्ती महासंघाने केंद्र सरकारला आपलं म्हणणं कळवलं असून यातील लैंगिक शोषणाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कुस्ती महासंघाने फेटाळले आरोप

- लैंगिक छळाचे आरोप निराधार, हे आरोप आम्ही मान्य करत नाही

-कुस्ती महासंघाच्या लैंगिक छळ समितीकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही

-या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही.

-असे आरोप होणं वाईट आहे.

-मात्र, या आरोपाला कोणताही आधार नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com