Breaking ! उपमुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

Manish sisodia |CBI| उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Manish sisodia |CBI|
Manish sisodia |CBI|

नवी दिल्ली : दिल्लीचे ( Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. सिसोदिया यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. 'सीबीआय आली आहे. त्याचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच, ''आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही.'' असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.....

सिसोदिया यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांनीही सीबीआयचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, दिल्लीचे चांगले काम आम्ही थांबू देणार नाही. ज्या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर मनीष सिसोदिया यांचा फोटो आणि दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचे कौतुक करण्यात आले, त्याच दिवशी मनिष यांच्या घरावर केंद्राने सीबीआयला पाठवले. पूर्ण सहकार्य करेल. यापूर्वीही अनेकदा तपास आणि छापे टाकण्यात आले, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही आणि आताही काही निष्पन्न होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com