'सुएझ' बंदच : कालव्यातील महाकाय जहाज बाहेर काढण्याची खरी परीक्षा अजून बाकी!

सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन मालवाहू जहाज पुन्हा अंशत: पाण्यावर तरंगू लागले असले तरी ते कालव्यातून बाहेर निघण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.
boskalis ceo says completing refloat of ever given ship is not easy
boskalis ceo says completing refloat of ever given ship is not easy

सुएझ : सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर अखेर पुन्हा पाण्यावर तरंगू लागले आले. कालव्यात हे जहाज अडकून पडल्याने जागतिक जलवाहतुकीला मोठा फटका बसला आहे. जहाजाची दिशा काही प्रमाणात बदलण्यात यश आले असले तरी ते कालव्यातून दुसरीकडे हलवण्याबाबत अद्याप अनिश्चतता आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. 

जहाजाचा कमी पाण्यात अडकून बसलेला पुढील भाग मोकळा झाला असला तरी कालव्यातून हे जहाज बाहेर काढणे अतिशय कठीण बाब आहे. हे जहाज बाहेर काढण्याचे काम स्मिट सॅल्व्हेज ही कंपनी करीत आहे. आता पुढील मोहिमेसाठी भरतीची प्रतीक्षा सुरू आहे. भरतीच्या वेळी जहाज बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. 

स्मिट सॅल्व्हेज कंपनीची पालक कंपनी असलेल्या बोस्कालीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर बेर्डोवस्की म्हणाले की, जहाज अंशत: पाण्यावर तरंगू लागले ही बाब चांगली असली तरी ही संपूर्ण मोहीम पार पाडणे खूप अवघड आहे. जहाजाच्या पुढील भागाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येईल. जहाजाचे तोंड पूर्णपणे रिकामे करण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास जहाजावरील कंटेनर उतरवण्याचा मार्ग अखेर स्वीकारावा लागेल. 

एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज 400 मीटर (1 हजार 300 फूट) लांबीचे आहे. या जहाजातील सर्वच्या सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जगातील सर्वाधिक व्यग्र असलेला जलवाहतूक मार्ग या जहाजाने सुमारे आठवडाभर रोखून धरला आहे. यामुळे दररोज 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकून पडत आहे. याचाच परिणाम होऊन अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत आणि काही जहाजांनी लांबचा आफ्रिकेचा मार्ग स्वीकारला आहे. 

जागतिक जलवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यातील वाहतूक लवकरच सुरळीत होईल, अशी आशा आहे. परंतु, अद्याप यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जमिनीत एका बाजूला रुतलेले जहाजाचे तोंड रिकामे करुन त्याची दिशा काही प्रमाणात सरळ झाली आहे. मात्र, जहाजाची दिशा पूर्णपणे सरळ करुन ते कालव्यातून बाहेर काढण्यास आणखी कालावधी लागणार आहे. यामुळे जलवाहतूक कोंडी अद्याप सुटलेली नाही.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com