ब्रिटनमध्ये जॉन्सन सरकार कोसळले; तब्बल ४० मंत्र्यांच्या राजीनाम्यापुढे पंतप्रधान झुकले

Boris Johnson Resigns | दोन दिवसांपासून जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव
Boris Johnson Latest Marathi News
Boris Johnson Latest Marathi NewsSarkarnama

Boris Johnson Resigns

लंडन : ब्रिटनमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. देशाला संबोधित करुन त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. मागील दोन दिवसांपासून जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. मागच्या ४८ तासांमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातील ४० मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. एकूणच जॉन्सन यांना पार्टी प्रकरण आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना सरकारमध्ये सहभागी करून घेणे भोवल्याचे दिसत आहे. (Boris Johnson Resigns Latest News)

राजीनाम्याची घोषणा करताना जॉन्सन म्हणाले, कॉंझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन नेता आणि पुढच्या पंतप्रधानांची निवड करेल. पण जोपर्यंत नवीन नेता निवडला जात नाही तोपर्यंत आपण या पदावर राहू. मला माझ्या पंतप्रधान म्हणून केलेल्या कामांचा खूप अभिमान आहे, मात्र जगातील सर्वोत्तम पद सोडल्याचं दुःख होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नव्या नेत्याला शक्य तेवढा पाठिंबा देवू असाही विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला. दरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अधिवेशनात नेत्याची निवड केली जाणार आहे. पक्षाचे अधिवेशन ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान जॉन्सन यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. पण कालांतराने एकापाठोपाठ एका वादात ते सापडतं गेले. यात लॉकडाऊन काळातील पार्टी प्रकरण असो किंवा लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना सरकारमध्ये सहभागी करुन घेण्यावरुन उफाळलेला वाद असो. या दोन्ही गाजलेल्या वादांमध्ये त्यांनी आपली चुक झाल्याचे मान्य केले होते. यातून ते आपलं पद वाचवण्यासाठी एक प्रकारे प्रयत्न करत होते. (Boris Johnson Resigns Latest News)

परंतु मागील पंतप्रधान जॉन्सन यांच्या निर्णयांविषयी मंत्र्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी मंगळवारी रात्री उफाळून आली. भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला. पंतप्रधानांच्या नेतृत्वावर माझा आता विश्वास राहिलेला नाही आणि घोटाळेबाज सरकारसाठी काम करू शकत नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर राजीनाम्यांची जणू त्सुनामीच आली. तब्बल ४० हून अधिक मंत्र्यांनी राजीनामा देत बोरिस यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in