राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

न्यायालयाने महानगर दंडाधिकाऱ्यांना दिले आदेश...
राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Rahul GandhiSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मुंबईतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात राहुल यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. हा दावा रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरनंतर घेण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाला दिले.

राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये राजस्थानमधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याचा दावा महेश हुकुमचंद श्रीश्रीमाळ यांनी केला आहे. ते भाजपचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका रद्द करण्याची मागणी राहुल यांच्याकडून उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
देशातील २५ राज्यांनी करून दाखवलं! ठाकरे सरकारला अजूनही जमेना...

सोमवारी श्रीश्रीमाळ यांनी वकिलांमार्फत न्यायालयात राहुल यांच्या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. न्यायाधीश एस. के. शिंदे यांनी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच मुळ याचिकेवर सुनावणी असलेल्या न्यायालयाला २० डिसेंबरपर्यंत सुनावणी न घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राहुल गांधी यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.

राहुल गांधी यांना येत्या २५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. राजकीय उद्देशाने ही याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे मानहानीची याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावर २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in