एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडमधील पार्टी; अनेक बडे मासे लागणार गळाला

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. आता एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडमध्ये झालेली एक मोठी पार्टी आली आहे.
bollywood party at sushant singh rajputs farm house is now on ncb radar
bollywood party at sushant singh rajputs farm house is now on ncb radar

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) बॉलीवूडमधील अमली पदार्थ माफियांवरील कारवाईची मालिका कायम आहे. आता एनसीबीच्या रडारवर चित्रपटसृष्टीत झालेली एक मोठी पार्टी आली आहे. या पार्टीत बॉलीवूडमधील अनेक बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. या पार्टीशी संबंधित प्रत्येकाला लवकरच समन्स पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये झालेल्या एका पार्टीत बॉलीवूडमधील 11 बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना एनसीबीकडून चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रिया आणि शौविकच्या चौकशीतून, तसेच व्हॉट्‌सऍप चॅटमधून अनेक अमली पदार्थ तस्करांचा पर्दाफाश झाला आहे. त्यानुसार एनसीबीने काही जणांना अटक केली आहे. एनसीबीने पवई, अंधेरी अणि ठाणे परिसरात छापे टाकत अंकुश अरनेजा, राहिल रफत विश्रा उर्फ सॅम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक हजार 418 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच चार लाख, 36 हजार रुपये जप्त केले आहेत.

एनसीबीने ताब्यात घेतलेल्या तस्करांच्या चौकशीतून अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. यामुळे एनसीबीने मुंबई, ठाणे परिसरात छापे घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पालघर येथेही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी तसेच साठा असल्याची माहिती मिळाली असून, त्या अनुंषगाने एनसीबीने तपासास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या माफियांपर्यंत एनसीबी पोचली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्‍यता आहे. 

या प्रकरणात सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर पवनने महत्वाची माहिती एनसीबीला दिली आहे. या फार्म हाऊसवर अनेक पार्ट्या झाल्या असून, त्यात काही सेलिब्रेटीही सहभागी झाले होते. त्याप्रकरणी आता एनसीबी संशयितांना समन्स पाठवण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनची सीबीआयनेही चौकशी केली आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com