हेलिकॉप्टर अपघात : अखेर 3 दिवसांना 6 अधिकाऱ्यांची ओळख पटली

आता आणखी सहा अधिकाऱ्यांच्या मृतदेहांची ओळख पटली असून, ते त्यांच्या घरी आज पाठवण्यात येतील.
Helicopter Crash
Helicopter CrashSarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी केवळ तीनच जणांच्या मृतदेहांची ओळख सुरवातीला पटवता आली होती. आता आणखी सहा अधिकाऱ्यांच्या मृतदेहांची ओळख पटली असून, ते त्यांच्या घरी आज पाठवण्यात येतील, अशी माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघात एवढी भीषण होता की, मृतांची ओळख पटवणे अवघड बनले आहे. सुरवातीला केवळ तीनच जणांच्या मृतदेहांची ओळख पटवता आली होती. त्यात जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर यांचा समावेश होता. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांची ओळख पटवता आलेली नव्हती. त्यातील सहा अधिकाऱ्यांची ओळख अखेर पटली असून, इतर तीन जणांची ओळख पटणे बाकी आहे. ओळख पटवण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची मदत घेतली जात आहे. याचबरोबर इतर वैद्यकीय तपासण्यांचा आधार घेतला जात आहे. ओळख पटल्यानंतरच हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांचे मृतदेह दिल्लीतील आर्मी बेस रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. आज ओळख पटलेल्यांममध्ये लान्स नायक विवेक कुमार, ज्युनियर वॉरंट ऑफिसर प्रदीप, विंग कमांडर पी.एस.चौहान, ज्युनियर वॉरंट ऑफिसर प्रताप दास, लान्स नायक बी.साई तेजा आणि स्क्वाड्रन लीडर कुलदीपसिंग यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या घराजवळच्या विमानतळावर पाठवण्यात येतील. त्याआधी रुग्णालयातच त्यांना अभिवादन केले जाईल.

Helicopter Crash
भाजपमध्ये गेलेल्या दोन नेत्यांची आमदारकी धोक्यात; काँग्रेसचा विधानसभेत प्रस्ताव

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत बोलताना रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करणार आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स आता सापडला आहे. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

Helicopter Crash
परमबीरसिंहांनी जबदरस्तीने व्हॉट्सअॅप मेसेज करायले लावले; एसीपीचा गौप्यस्फोट

जनरल बिपिन रावत हे 8 डिसेंबरला तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. परंतु, तमिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदरसिंग, नायक गुरूसेवकसिंग, नायक जितेंद्रसिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com