तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तान पुन्हा हादरले; 32 ठार

तालिबान्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर अफगाणिस्तानाला सतत हादरे बसत आहेत.
Kandahar Blast
Kandahar Blast

कंदाहार : तालिबान्यांनी (Taliban) सत्ता हातात घेतल्यानंतर अफगाणिस्तानाला (Afghanistan) सतत हादरे बसत आहेत. आता तेथील मशिदींना लक्ष्य केले जात आहे. शुक्रवारी (ता. 15) कंदाहारमधील मशिदीमध्ये स्फोट (Blast in Kandahar) झाला असून यामध्ये शेकडो नागरीक जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मागील आठवड्यातील शुक्रवारी अफगाणिस्तानातील कुंदुज शहरातील शिया मशिदीमध्ये हल्ला झाला होता. यामध्ये 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात मशिदीमध्ये स्फोट झाल्याने अफगाणिस्तान हादरले आहे. मागील आठवड्यात झालेल्या स्फोटावेळी मशिदीत सुमारे 300 नागरीक उपस्थित होते. मशिदीमध्ये उपस्थित असलेले अनेक जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढत चालला आहे.

Kandahar Blast
आधी सात नागरिकांच्या हत्या अन् आता पाच दिवसांत सात जवान धारातीर्थी

या धमाक्यातून सावरत असताना शुक्रवारी कंदाहार शहरातील मशिदीत स्फोट झाला. यावेळी मशिदीत नमाजासाठी अनेक नागरीक जमा झाले होते. सध्यातरी या स्फोटात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेकजण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. आपल्या निशाण्यावर शिया मुसलमान आणि त्यांच्या धार्मिक संस्था असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सरकार बनवल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला होता. हा आत्मघातकी हल्ला होता, असे समोर आले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर ऑगस्ट महिन्यात ताबा मिळवला. अफगाणिस्तानचे अध्यक्षांनी पलायन केल्यानंतर तालिबानने सत्ता काबीज केली. सरकारही स्थापन करण्यात आले आहे. पण आता काही दिवसांतच देशाला हादरे बसू लागले आहेत. ISIS कडून मशिदींना लक्ष्य केले जात असल्याने नव्या सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com