लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं आणखी एक नवं अभियान

Loksabha Elelction 2022 |जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे.
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणूकांमधील ‘मिशन 45 ‘च्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) राज्यभरात ‘धन्यवाद मोदीजी’ (Narendra Modi) अभियान राबवणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून भाजप या अभियानाला सुरुवात करत आहे.

या अभियानातंर्गत भाजपकडून केंद्र सरकारमधील योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे. इतकेच नव्हे तर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी असे पत्र पाठवले जाणार आहे. या अभियानांतर्गंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण दहा लाख पत्र पाठवण्याचं नियोजन राज्य भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. यासाठीच धन्यवाद मोदीजी अशी दहा लाख पत्रेही त्यांना पाठवली जाणार आहे.

PM Narendra Modi Latest Marathi News
पंतप्रधान मोदींनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट पाहावा, यासाठी प्रयत्न करणार : अमोल कोल्हे

भाजपने लोकसभा निवडणूकीसाठी 'मिशन 45’ च्या असे ध्येय ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौर बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण सध्या भाजपकडून राष्ट्रवादीच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसह आता विधानसभेचीही तयारी भाजपने तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकएक विधानसभा मतदारसंघही पिंजून काढण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच आता भाजप मंत्र्यांचे राज्यबर दौरे पाहायला मिळणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com