Politics : देशातील विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव; चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका

Ashok Chavan : ''आगामी काळात निवडणुकींमध्ये समविचारी पक्षांसोबत काँग्रेसने आघाडीबाबत निर्णय घ्यावा''
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

Congress : छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा असून आज या अधिवेशनात काँग्रेसच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. या अधिवेशनासाठी काँग्रेसचे देशभरातील दिग्गज नेते उपस्थित आहेत.

या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनादरम्यान बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

यावेळी चव्हाण म्हणाले,''सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. न्यायमुर्ती सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. न्यायालये ही न्यायाची शेवटची आशा असते. उद्या तिथेही न्याय मिळणार नसेल तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे?'', असा सवाल त्यांनी केला.

Ashok Chavan
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

''केंद्र सरकारकडून लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत केले जात आहेत. संसदेत ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही. वास्तव सांगणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखले जाते. आयुर्विमा महामंडळ, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि शेयर मार्केटमध्ये देशातील नागरिकांनी गुंतवलेले कोट्यवधी रूपये बुडतात.

पण त्याची साधी चौकशी होत नाही. केंद्र सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांना, माध्यम संस्थांना त्रास दिला जातो. प्रसार माध्यमांची स्वायत्तता शिल्लक राहिलेली नाही'', असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

Ashok Chavan
By-Election : चिंचवडमध्ये ५१० मतदान केंद्रावर तीन हजार कर्मचारी अन् पावणेचार हजार पोलीस तैनात

''भाजप राजकीय सूडबुद्धीने वागत असल्याचा असून राजभवनातून लोकनियुक्त सरकारांना अस्थिर करण्याचे प्रयत्न आम्ही महाराष्ट्रात अनुभवले. पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. फुटीर खासदार, आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होत नाही.

सर्वोच्च न्यायालयात तारखांवर तारखा पडत राहतात. एखाद्या घरात चोरांनी राजरोसपणे घुसावे, रात्रभर झोपावे आणि सकाळी उठून त्याच घरावर मालकी सांगावी'', असा हा प्रकार असल्याचे चव्हाण म्हणाले.

Ashok Chavan
Pune Bypoll Election : पैसे वाटणं भाजपची संस्कृती नाही, महाविकास आघाडीचा रडीचा डाव; फडणवीसांचा पलटवार

''इंग्रजांचे 'फोडा आणि झोडा'चे धोरण भाजपने स्वीकारले आहे. याच तत्वाने देशभरातील विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. देशासाठी आता काँग्रेस हाच आशेचा एकमेव किरण आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड समर्थन लाभले.

पुढील काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार समविचारी व धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस नेतृत्वाने निर्णय घ्यावा'', अशीही मागणी यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.

Ashok Chavan
Ramdas Athwale: नाव बदलून शहराचा विकास होत नाही; रामदास आठवलेंना नक्की म्हणायचं काय?

दरम्यान, रायपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा होता. या अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com