भाजप आता ताकही फुंकून पिणार! नेत्यांसाठी आखली लक्ष्मणरेषा

भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक मुस्लिमबहुल देशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
BJP Latest Marathi News
BJP Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : भाजप नेत्यांकडून पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जगभरातील अनेक मुस्लिमबहुल देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता भाजप खडबडून जागे झाले असून आपल्या प्रवक्त्यांसाठी लक्ष्मणरेषा आखून दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. माध्यमांसह कोणत्याही चर्चांमध्ये सहभाग घेतल्यानंतर टोकाची भूमिका न मांडण्याच्या सूचना नेत्यांना दिल्याचे समजते. (BJP Latest Marathi News)

वादग्रक्त वक्तव्यप्रकरणी भाजपने नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन कुमार जिंदाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कुवेत, इराण, इराक, ओमान, सौदी अरेबिया यांसह अनेक देशांनी भारताच्या राजदुतांना पत्र पाठवून कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या देशांना भारताला उत्तर द्यावे लागले आहे. (BJPs New Rules For Leaders Joining TV Debates)

BJP Latest Marathi News
अनिल देशमुखांना जामीन देऊ नका म्हणणाऱ्या केतकी चितळेची उच्च न्यायालयात धाव

नेत्यांच्या वक्तव्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत असल्याने भाजपने आता सर्व प्रवक्त्यांना सक्त ताकीद दिल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ अधिकृत प्रवक्ते आणि पॅनलिस्ट यांनीच टीव्हीवरील चर्चांमध्ये सहभागी व्हावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

त्यांना पक्षाचा माध्यम विभाग सहभागी होण्यास सांगेल. कोणत्याही धर्माविरोधात बोलू नये, धर्मातील पुजनीय व्यक्ती आणि प्रतिकांविषयी बोलू नये, असंही सांगण्यात आलं आहे. संयमित भाषेचा वापर करण्याचा सल्लाही भाजपने प्रवक्त्यांना दिला आहे. कोणत्याही चर्चेत भावूक किंवा चिथावणीखोर बोलू नये, असा सल्ला दिल्याचे समजते.

BJP Latest Marathi News
तुमचं ते गेट-टूगेदर आणि आमचं..! संजय राऊतांनी भाजपला सुनावलं

पक्षाची विचारधारा आणि मुल्यांचे उल्लंघन होता कामा नये. कोणत्याही टीव्हीवरील चर्चेत सहभागी होण्याआधी विषयाची माहिती घ्यावी, त्याची तयारी करावी. त्या विषयावर पक्षाची भूमिका जाणून घ्यावी. कोणत्याही सापळ्यात अडकू नये. सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना लोकांसमोर मांडाव्यात, असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com