दिल्लीत भाजपचा नवा डाव, 'नमो सेवा केंद्रे' होणार सुरू

केजरीवाल सरकारची (Arvind Kejriwal Government) मतपेढी यानिमित्ताने खिळखिळी करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न आहे.
दिल्लीत भाजपचा नवा डाव, 'नमो सेवा केंद्रे' होणार सुरू
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या परिक्षेत्रातील 32 विधानसभा मतदार संघांच्या परिसरामध्ये नमो सेवा केंद्रे (Namo Seva Kendra) सुरू करण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारची मतपेढी यानिमित्ताने थोडी खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आगामी वर्षात होणाऱ्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी व महापालिका कायम राखण्यासाठी भाजपने हा नवा डाव खेळण्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र, मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना दिल्लीतील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सशक्त माध्यम म्हणजे ही केंद्रे असतील, असे ज्येष्ठ भाजप नेते श्याम जाजू (Shyam Jaju) यांनी सांगितले.

Narendra Modi
साखर कारखाना म्हणजे गौडबंगाल असे चित्र उभे केले जात आहे

भाजपा कार्यकर्ते प्रस्तावित नमो सेवा केंद्रांच्या माध्यमातून दिल्लीतील झोपडपट्टीवासीयांना येणाऱ्या रोजच्या अडचणींवर उपाययोजना शोधण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महानगरात राहणाऱ्या गरीब नागरिकांना रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड काढणे, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवणे, रोजगार आदीमध्ये अडचणी येतात. अनेकदा यात भ्रष्टाचारही होतो. या कामांमध्ये भाजपा कार्यकर्ते झोपडपट्ट्यांमधील गरिबांची मदत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नेतृत्व असूनही विधानसभेच्या रणधुमाळीत आपकडून सलग दोनदा सपाटून पराभूत झालेल्या भाजपने प्रतिष्ठित नवी दिल्लीसह 3 नगरपालिकांमध्ये मात्र, याच कालावधीत सत्ता कायम राखली आहे.

Narendra Modi
भाजपच्या प्रस्तावावर आठवडाभरात निर्णय ; महावितरण कार्यालयावरील मोर्चा रद्द

सर्वसामान्य नागरिकांची कामे या नगरपालिकांच्या माध्यमातूनच होत असतात. 2007 पासून नगरपालिकांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विजयाची पुनरावृत्ती होईल, असा भाजपला विश्वास आहे. दिल्लीसाठी या मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जातात. मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजना दिल्लीतील गरिबापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नाहीत, केजरीवाल सरकारकडून त्यात अडथळे आणले जातात, असा भाजप नेत्यांचा आक्षेप आहे. यावर्षी दसऱ्यापासून भाजपने दिल्लीत झोपडपट्टी सन्मान यात्रा सुरू केल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला असून ह्या यात्रा गोरगरिबांची गर्दी खेचून घेण्यात यशस्वी होत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता या वर्गावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आता 32 विधानसभा क्षेत्रांतील झोपडपट्ट्यांमध्ये हे केंद्र काढण्याची तयारी सुरू करण्याची योजना भाजपाने आखली आहे. भाजप या केंद्रांच्या माध्यमातून उज्वला, गरीबांना मोफत धान्य, जेथे झोपडी तेथे पक्के घर यासारख्या सरकारच्या योजनांचा लाभ गरिबांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते सोमवारी (ता.22 नोव्हेंबर) बैठक घेऊन अंतिम रूपरेखा तयार करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in