रोहिंग्या-बांगलादेशींविषयी भाजपचे नवीन फर्मान

BJP On Rogingya- bangladeshi news| Adesh Gupta| रोहिंग्या-बांगलादेशींना आश्रय देणारे विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत, असा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे.
रोहिंग्या-बांगलादेशींविषयी भाजपचे नवीन फर्मान
Adesh Gupta|

BJP On Rogingya- bangladeshi news|

नवी दिल्ली : भाजपने राजधानी दिल्लीत नवे फर्मान जारी केले आहे. राजधानी दिल्लीत अवैधरीत्या राहणारे रोहिंग्या व बांगलादेशी यांची माहिती आपल्या पक्षाला द्यावी. जेणेकरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येईल, असे आवाहन दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीतील जनतेला केले आहेत.

दिल्लीत सुमारे ५ लाख रोहिंग्या व बांगलादेशी राहात असल्याचा दावाही त्यांनी केला. दिल्लीत बेकायदेशीरित्या राहणारे रोहिंग्या व बांगलादेशींच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी दिल्लीच्या लोकांनाच पुढे यावे लागेल. दिल्ली महापालिका त्यांच्या या बेकायदेशी ठिकाणांवर कारवाई करेल आणि त्यांच्याविरुदध कारवाई करण्यासाठी आम्हीही पोलिसांकडे दाद मागू’, असेही गुप्ता म्हणाले. इतकेच नव्हे तर. आदेश गुप्ता यांनी यावेळी आम आदमी पक्षावरही निशाणा साधला आहे. ‘आप’चे आमदार आणि त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या हितसंबंधांसाठी सर्व रोहिंग्या व बांगलादेशी यांची ‘आधार’ कार्डे व मतदार ओळखपत्रे तयार करत असल्याचा आरोपही गुप्ता यांनी केला.

Adesh Gupta|
नाट्यमय घडामोडीनंतर भाजप नेत्याला दिलासा; HC न्यायाधीशांच्या घरात मध्यरात्री सुनावणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आदेश गुप्ता यांनी गुरुवारी दक्षिण व पूर्व नगरच्या नगराध्यक्षांना पत्र लिहून अतिक्रमण करून राहणाऱ्या रोहिंग्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दिल्लीत रोहग्या-बांगलादेशींना स्थान नाही. जहांगीरपुरीतील घटनेनंतर हीच टोळी दंगलखोर, त्यांचे अवैध धंदे आणि अतिक्रमण वाचवण्यासाठी पूर्णतः सक्रिय झाली आहे. गेल्या 60 वर्षांपासून देशात राहून जाती-धर्मावर आधारित राजकारण केल्याचा दावाही केला आहे.

बांगलादेशी-रोहिंग्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर जे वकील सर्वोच्च न्यायालयात गेले, तेच वकील राम मंदिराच्या उभारणीला विरोध करताना श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दिल्ली, पंजाब, उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीला पाठिंबा देणारी राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारी एकच संघटना आहे. संपूर्ण देशाला रोहिंग्या-बांगलादेशींच्या या संंघटनेची माहिती झाली आहे. आधी काँग्रेसने त्यांचा बंदोबस्त केला आणि आता आम आदमी पार्टी त्यांना पैसे आणि इतर मदतीसह मोफत वीज, पाणी आणि रेशन देत आहे. एवढेच नव्हे तर सरकारी जागा, शाळा, उद्याने इत्यादींसाठी आरक्षित जागांवर देखील त्यांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.