राष्ट्रपती निवडणूक : ममता बॅनर्जींनी बैठक बोलावताच; भाजप अॅक्शन मोडवर, थेट खर्गेंना फोन

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक झाली
presidential election 2022 news, Mamata Banerjee, Narendra Modi, Mallikarjun Kharge
presidential election 2022 news, Mamata Banerjee, Narendra Modi, Mallikarjun Khargesarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) आघाडीकडे आपला उमेदवार निवडून आणण्याइतके 'मताधिक्य' सहज उपलब्ध असल्याचे जाणवल्यावर भाजप नेतृत्वाने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न चालविले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याशी दूरध्वनीवरून नुकतीच चर्चा करून या निवडणुकीबाबत 'तुमचे मत काय'? अशी विचारणा केली. एका परिस्थितीत भाजप आघाडीची बैठक लवकरच बोलावली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह विरोधी पक्षांच्या हालचालींकडेही भाजप नेतृत्वाचे 'बारीक' लक्ष आहे. (presidential election 2022 news)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राज्यसभा सचिवालयाने सुरु केली आहे. २९ जून रोजी अर्जमाघारीची अखेरची मुदत आहे. त्याच सुमारास सत्तारूढ एनडीएकडून उमेदवाराची घोषणा केली जाईल. यासाठी भाजप एखाद्या महिलेला उमेदवारी देईल अशी आतापावेतो चर्चा आहे. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या धक्कातंत्राचा पूर्वानुभव पहाता भाजप गोटातून सर्वोच्च पदासाठी एखादे मुस्लिम नावही पुढे येऊ शकते. तसे आले तर निवडणूक बिनविरोध किंवा प्रचंड एकर्फीही होऊ शकते.

presidential election 2022 news, Mamata Banerjee, Narendra Modi, Mallikarjun Kharge
कॉंग्रेस उमेदवाराला मतदान करणं भोवलं; भाजप आमदाराची हकालपट्टी

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती नवडणुकीसाठी आज बोलावलेल्या बैठकीपासून चार मुख्यमंत्री व अनेक विरोधी पक्ष चार हात दूर राहिले. ही भाजपसाठी दिलासादायक बाब आहे. ममतांचे आवतण न स्वीकारणाऱ्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा टीआरएस, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली व पंजाबात सत्ता असणारा आम आदमी पक्ष, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर कांग्रेस, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बीजू जनता दल व अकाली दल यांचे प्रतीनिधी आले नाही.

मायावतींचा बहुजन समाज पक्ष व असदुद्दिन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षांना ममता यांनी आमंत्रणच दिले नाही, असे कळते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनच नव्हे तर डाव्या पक्षांचे सीताराम येच्युरी व डी राजा हे सर्वोच्च नेते या बैठकीपासून दूर राहिले आहेत. येच्युरी यांनी महात्मा गांधींचे वंशज गोपालकृष्ण गांधी यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचविले होते. ममता यांनी ते अमान्य केले अशी माहिती मिळते. गांधी मागच्या वर्षी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वेंकय्या नायडू यांच्याकडून पराभूत झाले होते.

presidential election 2022 news, Mamata Banerjee, Narendra Modi, Mallikarjun Kharge
ईडीचे प्रश्न संपेना; राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशीही चौकशीला हजर राहण्याचे आदेश

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजनाथसिंह व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भाजप मित्रपक्ष व सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले. आता राजनाथसिंह यांनी थेट खर्गे यांनाच फोन लावल्याचे वृत्त आले आहे. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची गेले ३ दिवस ईडीकडून होणारी झाडाझडती पाहता दोन्ही पक्षांतील संबंध सुरळीत नाहीत हेही उघड आहे. या स्थितीत दुपारी पोलिस ठाण्यात जाऊन आलेले खर्गे यांनी राजनाथसिंह यांच्याशी काय संवाद साधला हेही कळायला मार्ग नाही. मात्र, भाजप आघाडीच जिंकणार असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, असे सत्तारूड नेतृत्वाने मनावर घेतल्याचे स्पष्ट दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com