मोदी-योगींना जोरदार धक्का; वाराणसीत अपक्षाने केला भाजपचा पराभव

उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारणाऱ्या भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीतही विरोधकांचा सुफडा साफ केला आहे.
CM Yogi Adityanath, PM Narendra Modi
CM Yogi Adityanath, PM Narendra ModiSarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत (UP Election 2022) भाजपने इतिहास घडवत विरोधकांना धूळ चारली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही 36 पैकी 33 जागा जिंकत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. पण या निवडणुकीत वाराणसी (Varanasi) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवाराचा दारूण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

विधान परिषदेच्या (MLC) एकूण 36 जागांपैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला (SP) या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. अपक्षांना वाराणसी, आझामगड आणि प्रतापगड या तीन जागांवर विजय मिळाला आहे. तसेच अन्य काही मतदारसंघातही अपक्षांनी सपाला जोरदार झटका दिला आहे.

CM Yogi Adityanath, PM Narendra Modi
नॉट रिचेबल सोमय्या अखेर अवतरले अन् गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत म्हणाले...

पंतप्रधान मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसी मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुदामा पटेल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा सिंह यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. पटेल हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर सपाचे उमेदवार उमेद यादव दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सिंह यांना 4 हजार 234 मतं मिळाली असून सपाला 345 तेर भाजपला केवळ 127 मतं मिळाली आहे. भाजपच्या या धक्कादायक पराभवामुळे उत्तर प्रदेशात चर्चेला ऊत आला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाकडून भाजपला आव्हान दिलं जाईल, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष निकालामध्ये वेगळंच चित्र दिसून आलं आहे. एकूण 36 पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. भाजपने 33 जागा जिंकत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. अनेक जागांवर सपाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.

CM Yogi Adityanath, PM Narendra Modi
नॉट रिचेबल सोमय्या अखेर अवतरले अन् गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत म्हणाले...

भाजपच्या हातून निसटलेल्या तीन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. कुशीनगर आणि देवरिया मतदारसंघातून सपाच्या तिकीटावर उभे राहिलेले डॉ. कफील खान यांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. गोरखपूर रुग्णालयातील ऑक्सीनज प्रकरणात खान यांच्यावर योगी सरकारने ठपका ठेवला होता. त्यांनाच सपाने उमेदवारी दिली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत भाजपने विधानसभेपाठापोठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही विजय मिळवला आहे. भाजपचे दिनेश प्रताप सिंह विजयी झाले आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनिल कुमार साजन लखनऊ मतदारसंघात पराभूत झाले आहेत. त्यामुळे अखिलेश यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com