Lucknow Politics : घोसीतील पराभव भाजपच्या जिव्हारी; कारणे शोधण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती

UP BJP Politics : उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.
Lucknow Politics :
Lucknow Politics :Sarkarnama

Lucknow Politics : उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सर्वच पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. त्यामुळे घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी एक विशेष पथक घोसी येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती या पराभवाची कारणे शोधून कामाला लागण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

घोसीतील पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार दारा सिंह चौहान यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. विशेषतः या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व काँग्रेसने एकत्रित येत निवडणूक लढवली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील वातावरण बदलू लागल्याचीही चर्चा आहे.

Lucknow Politics :
Rajasthan Politics: राजस्थानमध्ये काँग्रेसला गळती; भाजपला चमत्काराची आशा

घोसी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या प्रचारात प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील वीस मंत्री उतरले असताना भाजपला का पराभव स्वीकारावा लागला, याची कारणे शोधली जात आहेत. विशेषतः समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने या ठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपसमोरील आव्हानेही वाढली आहेत.

दारा सिंह चौहान यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. कारण त्यांनी सपा, बसपा व काँग्रेस मार्गे भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इतके पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीलाही उमेदवारी देऊ नये अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली होती, त्यांची मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून दारा सिंह हेच निवडणूक जिंकतील असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, त्यांचा पराभव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. दारा सिंह यांच्या प्रचार मोहिमेकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप केला जात आहे. या पराभवामुळे येत्या काळात भाजपला या ठिकाणी ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Lucknow Politics :
INDIA Alliance News : मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या 'इंडिया' आघाडीत 'बिघाडी'; 'हे' आहे कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in